अक्षयकुमारच्या ‘केसरी’चा सेट खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:39 AM2018-04-25T00:39:11+5:302018-04-25T00:39:11+5:30
पिंपोडे बुद्रुक/वाठार स्टेशन : अभिनेता अक्षयकुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचे चित्रीकरण कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे सुरू आहे. त्यातील युद्धाचा प्रसंग साकारण्यासाठी उभारलेला सेट मंगळवारी सायंकाळी आगीत खाक झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कॅमेरे भस्मसात झाले असून, सेटचे नुकसान झाले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपोडे बुद्रुक येथे तीन महिन्यांपासून धर्मा प्रॉडक्शन निर्मित अक्षयकुमार यांच्या ऐतिहासिक केसरी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. अक्षयकुमार मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे चित्रीकरण पूर्ण करून ते मुंबईकडे गेले होते. काही युद्धजन्य परिस्थितीचे शॉट घेण्याचे काम सुरू होते. या दरम्यान, साडेपाचच्या सुमारास अचानक आग लागली.
आग विझविण्यासाठी शरयू शुगर, किसन वीर कारखाना, फलटण व वाई येथून अग्निशमन बंब बोलावले. त्यांनी एक तासाने आग नियंत्रणात आणली. मात्र सेटसाठी लाकूड व प्लास्टिक साहित्याचा वापर केल्याने आगीने अल्पावधीत उग्ररूप धारण केल्याने सेटचे मोठे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनीही शर्तीचे प्रयत्न केले. पण अपयश आले.
सारागड उद्ध्वस्त
पंजाबमधील २१ शीख सैनिकांसाठी अफगानी लडाखूंविरोधात एकाकी झुंज दिली होती. हा इतिहास सारागड नावाच्या किल्ल्यावर घडला. याच सारागडचा सेट पिंपोडे बुद्रुक येथील घुमाई देवी परिसरात उभारला होता. त्यासाठी दोन महिने लागले. सारागडमधील युद्धजन्य शॉट घेत असताना अचानक आग लागली. त्यात तो जळून खाक झाला.
वाºयामुळं
होत्याचं नव्हतं
या चित्रपटात एका स्टेजला आग लागल्याचे दृश्य चित्रित करायचे होते. त्यासाठी उभारलेल्या स्टेजवर छोटा स्फोट घडविला. आगही लागली; पण वाºयामुळे आगीने भडका घेतला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले.