कºहाडात कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह आनंदाला उधाण : गुलालाची उधळण करीत केली फटाक्यांची आतषबाजी

By admin | Published: May 17, 2014 12:25 AM2014-05-17T00:25:46+5:302014-05-17T00:27:12+5:30

कºहाड : काँग्रेस राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर कºहाडात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

All the enthusiasm of the workers in the bone bloom: fireworks cracking fire | कºहाडात कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह आनंदाला उधाण : गुलालाची उधळण करीत केली फटाक्यांची आतषबाजी

कºहाडात कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह आनंदाला उधाण : गुलालाची उधळण करीत केली फटाक्यांची आतषबाजी

Next

कºहाड : काँग्रेस राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर कºहाडात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शहरातील दत्त चौकासह प्रमुख ठिकाणी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. याचवेळी केंद्रात ‘मोदी सरकार’ येणार हे निश्चित झाल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही आनंदोत्सव साजरा केला. सातारा लोकसभा मतदारसंघात १८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीबाबत कमालीची उत्सुकता होती. सकाळी आठ वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिक टीव्हीसमोर निकाल पाहण्यासाठी बसले होते. देश पातळीवरील निकालाबरोबरच राज्यात आणि प्रामुख्याने सातारा मतदारसंघात कोण विजयी होणार? याबाबत अंदाज व्यक्त केले जात होते. सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांनी प्रारंभीपासूनच मोठी आघाडी घेतल्यानंतर शहरातील विजय यादव यांच्यासह नगरसेवक हणमंत पवार, निवास पाटील, विनोद शिंदे, नरेंद्र लिबे, ओंकार मुळे, अशोक जिरगे यांच्यासह शिवबा ग्रुपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शहरातील चौकाचौकांत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. दुपारी १ वाजता अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील दत्त चौकात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर काही वेळातच शहरातील मोक्याच्या ठिकाणी उदयनराजेंना शुभेच्छा देणारे फलक उभारण्यास सुरुवात झाली. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार बनने निश्चित झाल्यामुळे तसेच राज्यात भाजप, शिवसेनेने, काँग्रेस आघाडीचा धुव्वा उडवल्याचा आनंदही साजरा करण्यात आला. भाजपचे प्रदेश प्रतिनिधी भरत पाटील, विष्णू पाटसकर, नाना सावंत आदींसह सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून दुचाकी रॅली काढून मोदींच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चावडी चौक परिसरात मिठाई वाटून भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. हिंदू एकता आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी सोमवार पेठ परिसरात भाजपला मिळालेल्या यशाचा आनंद फटाक्यांची आतषबाजी भगव्या रंगाची उधळण करीत केली. यावेळी नगरसेवक विनायक पावसकर, विक्रम पावसकर यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: All the enthusiasm of the workers in the bone bloom: fireworks cracking fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.