मराठा महासंघाच्या युवक उपाध्यक्षांवर खंडाळ्यात गोळीबार, हल्लेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 07:14 PM2022-11-22T19:14:44+5:302022-11-22T19:15:15+5:30

गोळीबाराच्या घटनने उडाली एकच खळबळ

All India Maratha Federation Maharashtra State Youth Vice President Prasad Pradip Konde fired | मराठा महासंघाच्या युवक उपाध्यक्षांवर खंडाळ्यात गोळीबार, हल्लेखोर पसार

मराठा महासंघाच्या युवक उपाध्यक्षांवर खंडाळ्यात गोळीबार, हल्लेखोर पसार

Next

मुराद पटेल

लोणंद/शिरवळ : अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदिप कोंडे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. खंडाळा तालुक्यातील मोर्वे-वाघोशी रस्त्यावरील वाघोशी खिंडीलगत दुचाकीवरुन आलेल्या दोघां अज्ञातांनी कोंडे यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, कोंडे यांच्या सुरक्षारक्षकांकडून संरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, गोळीबाराच्या घटनने एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेमागे नेमके कारण काय? याचा पोलिस शोध घेत आहेत.

याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, प्रसाद प्रदिप कोंडे हे पुणे जिल्ह्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबाचे दर्शन घेऊन खंडाळामधील मोर्वे येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कारने लोणंदकडे निघाले होते. दरम्यान, वाघोशी खिंडीलगत दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या कारच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर संरक्षणार्थ कोंडे यांच्या सुरक्षारक्षकांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली.

या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी खंडाळा, लोणंद आणि शिरवळ या तीनही पोलिस ठाण्यातून व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरी विशाल वायकर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे.

Web Title: All India Maratha Federation Maharashtra State Youth Vice President Prasad Pradip Konde fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.