मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व मराठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:50+5:302021-03-04T05:13:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : ‘महाराष्ट्र साहित्य परिषद नेहमीच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांचे संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रम ...

All Marathi for the promotion of Marathi language | मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व मराठी

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व मराठी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण

: ‘महाराष्ट्र साहित्य परिषद नेहमीच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांचे

संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. त्याला सर्व मराठी माणसांनी

मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला पाहिजे,’ अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य

परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.

कवी कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा दिनानिमित्त येथील श्रीराम एज्युकेशन

सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय व महाराष्ट्र

साहित्य परिषद, शाखा फलटण आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी

व्यासपीठावर श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, मसाप

फलटण शाखाध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, कार्यवाह ताराचंद्र आवळे,

प्राचार्य डॉ. डी. आर. राऊत उपस्थित होते.

बेडकिहाळ म्हणाले, ‘कुसुमाग्रज यांना मराठी साहित्यासाठी ज्ञानपीठ

पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळविणारे मराठीतील ते पहिले साहित्यिक

होत. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सावरकरांनी इंग्रजी शब्दाला मराठी

पर्यायी शब्द तयार केले; पण सर्वच पर्यायी शब्द वापरणे आपल्याला जमले नाही.

इंग्रजीचा प्रभाव १५० वर्षे आपल्यावर होता; त्यामुळे काही इंग्रजी शब्द

बोलीभाषेत आले. असे जरी असले तरी, आपल्या अंगात मराठी भाषा भिनलेली आहे.

आपल्याला कोणी चिमटा काढला तर पटदिशी आपल्या तोंडातून ‘आई गं’ किंवा

प्रचंड भीतिदायक वातावरण समोर आले तर ‘अरे बाप रे’ असा मराठी शब्द आपल्या

तोंडात येतो. आपण सर्वांनीच मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे.

जगातील प्रत्येक मराठी माणूस जिथे-जिथे असेल तिथे-तिथे तो मराठी भाषेत

बोलला तरच खऱ्या अर्थाने मराठी भाषा ही जागतिक पातळीवर सर्वमान्य होईल.’

यावेळी बापूसाहेब मोदी व डॉ. सतेज दणाने यांची भाषणे झाली. प्रारंभी वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्राचार्य शांताराम आवटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दयानंद बोडके यांनी सूत्रसंचालन केले. मसाप फलटणचे

कार्यवाह अमर शेंडे यांनी आभार मानले.

यावेळी मसाप फलटणचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासह बाळशास्त्री जांभेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक भिवा जगताप, अरुण खरात, प्रा. आनंद गायकवाड, डॉ. तेजश्री रायते, संदेश बिचुकले, कल्याणी गावडे, वनिता

कोळेकर, यशवंत पवार, दीपाली बागल, आरिफ तांबोळी, हरीष बेडके, मेघा अडसूळ, संतोष बोबडे यांच्यासह साहित्यप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळ : ०३फलटण भाषा दिन

कवी कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना रवींद्र बेडकिहाळ, बापूसाहेब मोदी, प्राचार्य शांताराम आवटे, ताराचंद्र आवळे, आदी उपस्थित होते.

Web Title: All Marathi for the promotion of Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.