आमचं ठरलं! आमदार जयकुमार गोरेंना पाडणारच; सर्वपक्षीय नेत्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 02:50 PM2019-07-15T14:50:11+5:302019-07-15T14:59:28+5:30

आमदार गोरे ज्या कुठल्याही पक्षातून उभे राहतील, तिथे सर्वपक्षीय एकमताने उमेदवार देतील असा निर्णय घेण्यात आला.

all party ministers decide to defeat jaykumar gore in satara | आमचं ठरलं! आमदार जयकुमार गोरेंना पाडणारच; सर्वपक्षीय नेत्यांचा निर्धार

आमचं ठरलं! आमदार जयकुमार गोरेंना पाडणारच; सर्वपक्षीय नेत्यांचा निर्धार

googlenewsNext

सातारा - आमदार जयकुमार गोरे यांचे माण खटाव तालुक्याच्या विकासात योगदान नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चमकोगिरी करत असून आमचं आता ठरलंय आमदार जयकुमार गोरे यांचा दुप्पट मतांनी पराभव करणार, असा इशारा येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आला आहे.

साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीला भाजपाचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख रासपचे जिल्हाध्यक्ष मामू शेठ विरकर, डॉ.  संदीप पोळ, वडूजचे नगरसेवक अनिल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार गोरे ज्या कुठल्याही पक्षातून उभे राहतील, तिथे सर्वपक्षीय एकमताने उमेदवार देतील असा निर्णय घेण्यात आला.
 

Web Title: all party ministers decide to defeat jaykumar gore in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.