निमसोडचा सर्वांगीण विकास साधणार : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:45 AM2021-03-01T04:45:23+5:302021-03-01T04:45:23+5:30

वडूज : ‘गावच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून यापुढे केवळ विविध कामे करत गावचा सर्वांगीण विकास करणार आहे. निमसोडचा पाणीप्रश्न ...

All-round development of Nimsod: Deshmukh | निमसोडचा सर्वांगीण विकास साधणार : देशमुख

निमसोडचा सर्वांगीण विकास साधणार : देशमुख

Next

वडूज : ‘गावच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून यापुढे केवळ विविध कामे करत गावचा सर्वांगीण विकास करणार आहे. निमसोडचा पाणीप्रश्न कायमचा मिटला आहे. उर्वरित कामे या पंचवार्षिकमध्ये पूर्ण करणार आहे,’ अशी ग्वाही नूतन सरपंच महेंद्र देशमुख यांनी दिली.

राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या निमसोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महेंद्र देशमुख, तर उपसरपंचपदी शीतल सांगवे यांची निवड करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. एकूण १५ सदस्यांपैकी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी ग्रामविकास पॅनलचे महेंद्र देशमुख यांना नऊ मते, तर विरोधी पक्षाचे गटनेते परिवर्तन पॅनलचे सुनील मोरे यांना पाच मते मिळाली. एक सदस्य अनुपस्थित राहिला तर उपसरपंचपदाच्या निवडणुकीत एकच अर्ज राहिल्याने शीतल सांगवे बिनविरोध निवडून आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल कृषी अधिकारी एस.व्ही. लोंढे यांनी काम पाहिले.

सरपंच महेंद्र देशमुख म्हणाले, ‘रणजित देशमुख व सदस्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, ग्रामसचिवालयाच्या नूतन इमारतीसह गावातील प्रलंबित प्रश्न विरोधकांना सोबत घेऊन मार्गी लावणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.’

उपसरपंच शीतल सांगवे म्हणाल्या, ‘महिलांसाठी स्वच्छतागृह व एसटी पिकअप शेडचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे. विरोधी पक्षाचे गटनेते सुनील मोरे म्हणाले, ‘स्वच्छ व निरपक्ष कारभारासाठी निमसोडच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याबरोबरच विरोधी पक्ष म्हणून ग्रामसेवा करणार आहे.’

काँग्रेसचे नेते व हरणाई सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील निमसोड ग्रामपंचायती वरती निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून काँग्रेस पक्षाची विचारधारा कायम राखली आहे.

यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकासचे महेंद्र देशमुख, शीतल सांगवे, उषा घाडगे, स्नेहा दिगंबर देशमुख, रेखा घाडगे, अनिकेत भांदिर्गे, मनोज खिलारे, शुभांगी महाजन, हणमंत पाटोळे, परिवर्तनचे विरोधी गटनेते सुनील मोरे, रवींद्र मोरे, शशिकांत मोरे, सीमा शितोळे, भारती घाडगे व राष्ट्रवादीच्या रेश्मा कदम उपस्थित होते. संजय शितोळे, ॲड. सुभाष देशमुख, विजय शितोळे, अभिजित देशमुख, भीमराव घाडगे, हुमायून तांबोळी, पोपट घाडगे, मोहन देशमुख, दिलीप देशमुख, युवराज घार्गे, संजय देशमुख, दिगंबर देशमुख उपस्थित होते.

२८निमसोड

निमसोडच्या सरपंचपदी महेंद्र देशमुख, तर उपसरपंचपदी शीतल सांगवे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्यांसोबत रणजितसिंह देशमुख. (छाया : शेखर जाधव)

Web Title: All-round development of Nimsod: Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.