लुटमारीतूनच खून; दहा दिवसांच्या आतच गुन्ह्याचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:06 PM2019-10-26T12:06:22+5:302019-10-26T12:16:27+5:30
औंध पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत शुक्रवारी तिघांच्या मुसक्या आवळल्या. हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असल्याची माहिती औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी ‘लोकमतशी’ बोलताना दिली.
औंध: रहिमतपूर येथील बेकरी व्यावसायिक रविराज बाळकृष्ण लोखंडे (वय ४१) वर्षे यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी केवळ दहा दिवसांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला.
राजू गेणू चव्हाण (वय २९), राहुल दत्तात्रय मेनन (वय २१, दोघेही रा. कºहाड), दत्तात्रय कृष्णत जाधव (वय २१, रा.दुशेरे, ता. कºहाड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
रविराज लोखंडे हे मागील काही वर्षांपासून औंध, पुसेसावळी परिसरात बेकरी प्राँडक्ट विकण्याचे काम करत होते. ते आपल्या वाहनातून फिरुन बेकरी माल विकत असत. बुधवार दि.१६ रोजी रात्री ते आपले काम आटोपून टेम्पोने परत कळंबीमार्गे रहिमतपूरकडे निघाले होते. कळंबीनजीकच्या एका दूध डेअरीजवळ त्यांचे वाहन अडवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. जादा रक्तस्त्राव झाल्यामुळे लोखंडे यांचा मृत्यू झाला होता. हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे. हे समोर येत नव्हते. औंध पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत शुक्रवारी तिघांच्या मुसक्या आवळल्या. हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असल्याची माहिती औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी ‘लोकमतशी’ बोलताना दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर हे करत आहेत.
या गुन्ह्यात एकूण सातजणांचा समावेश..
या गुन्ह्यात एकूण सात आरोपी सहभागी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने कºहाड, सातारा, पाटण विभागात केलेले अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
- साता-यात दाम्पत्यावर अॅट्रॉसिटीच्या गुन्हा
- सातारा : नळावर पाणी भरू नका, असे म्हणून शिवीगाळ केल्याप्रकरणी दाम्पत्यावर शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सनिया उर्फ सोनाबाई सय्यद शेख व पती सय्यद शेख (रा. लक्ष्मीटेकडी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दीपक उत्तम कांबळे (रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. घरासमोर पाणी भरत असताना सनिया शेख हिने कांबळे यांच्या आईला पाणी भरण्यापासून रोखले. तसेच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच सय्यद शेखने आईला ढकलून देऊन शिवीगाळ करून हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर शेख हे करत आहेत.