आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:39 AM2021-03-31T04:39:44+5:302021-03-31T04:39:44+5:30
सातारा : कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध ठिकाणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहरापासून जवळच ...
सातारा : कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध ठिकाणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा शहरापासून जवळच असलेल्या रामनगर हद्दीत असणारे हॉटेल मानस निश्चित केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष रामचंद्र ढेबे (रा. वाढेफाटा, सातारा) आणि संजय एकनाथ क्षीरसागर (वय ५०, रा. कोयना सोसायटी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील रामनगर गावच्या हद्दीत लिंब खिंड परिसरात हॉटल मानस आहे. रविवार, दि. २८ मार्च रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हे हॉटेल सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी संतोष ढेबे आणि संजय क्षीरसागर या दोघांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यातील पोलीश शिपाई राजेंद्र भाेंडवे यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास सहायक फौजदार बागवान करत आहेत.
दरम्यान, सातारा तालुक्यातील नागेवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल श्रीकृष्णाचे चालक सुरजीसिंग वाली (वय २९, रा. कृष्णा हॉटेलमागे, नागेवाडी, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निश्चित केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ हॉटेल सुरू ठेवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई राजेंद्र भोंडवे यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास सहायक फौजदार बागवान हे करत आहेत.