ढाकणीतील सर्व व्यवहार पाच दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:38 AM2021-04-21T04:38:58+5:302021-04-21T04:38:58+5:30

म्हसवड : माण तालुक्यातील ढाकणी गावात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता २० ते २५ एप्रिलदरम्यान पाच दिवस अत्यावश्यक सेवा ...

All transactions in the lid are closed for five days | ढाकणीतील सर्व व्यवहार पाच दिवस बंद

ढाकणीतील सर्व व्यवहार पाच दिवस बंद

googlenewsNext

म्हसवड : माण तालुक्यातील ढाकणी गावात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता २० ते २५ एप्रिलदरम्यान पाच दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय ढाकणी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

सातारा जिल्ह्यासह माण तालुक्यातील अनेक गावांसह ढाकणी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४ झाली आहे. पुढील काळात बाधित रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यासाठी २० ते २५ एप्रिलदरम्यान पाच दिवस अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय ढाकणी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

दरम्यान, ‘नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसू लागताच घरात न थांबता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेेऊन उपचार करून घ्यावेत. वेळ निघून गेल्यावर काही उपयोग होत नाही. बंद पाळल्यास गावातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होऊ,’ असा विश्वास सरपंच दत्तात्रय शिंदे यांना या समितीने दिला आहे.

Web Title: All transactions in the lid are closed for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.