जलिकट्टूला परवानगी देताय? मग बैलगाडी शर्यतीवरील बंदीही हटवा !
By admin | Published: January 24, 2017 12:48 AM2017-01-24T00:48:19+5:302017-01-24T00:48:19+5:30
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात : बैलांना सांभाळण्यासाठी हजारोंचा खर्च
सातारा : तमिळनाडूमध्ये सध्या ‘जलिकट्टू’ या खेळासाठी सुरू असलेले आंदोलन गाजत आहे. जलिकट्टूला पाठिंबा देण्याबरोबरच महाराष्ट्रातील बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी रविवारी कऱ्हाडात बैलगाडा मालकांनी रास्ता रोको केले. बैलगाड्या शर्यंतीही सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
जिल्ह्यात प्रगतशील अन् हौशी शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. सातारा जिल्ह्यातील गावोगावच्या यात्रांमधून बैलगाड्या शर्यती आयोजित केल्या जातात. शर्यतींसाठी पोटच्या पोरांप्रमाणे बैलांचा सांभाळ केला जात आहे. परंतु बैलगाड्या शर्यतींवर बंदी आल्याने शेतकऱ्यांची निराशा झालेली असतानाच शर्यतींचे बैल सांभाळणेही अवघड झाले आहे. तसेच शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.
बैलगाड्या शर्यंतींनाही अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे या शर्यंतींनाही आता महाराष्ट्रातही बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)