फलटणच्या कुंभारवाड्यात माठ बनविण्याची लगबग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:36 AM2021-04-03T04:36:07+5:302021-04-03T04:36:07+5:30

फलटण : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उष्णतामानात वाढ होत चालली आहे. तामपान ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास गेले आहे. त्यामुळे ...

Almost ready to build a field in Phaltan Pottery | फलटणच्या कुंभारवाड्यात माठ बनविण्याची लगबग!

फलटणच्या कुंभारवाड्यात माठ बनविण्याची लगबग!

Next

फलटण : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उष्णतामानात वाढ होत चालली आहे. तामपान ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास गेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातच नाही, तर इतरही अनेक ठिकाणी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला मागणी वाढू लागली असून, माठ बनविण्याची गडबड कुंभारवाड्यात दिसू लागली आहे.

अनेक ठिकाणी माठ विक्रीस आले आहेत. उन्हाच्या झळा आता वाढू लागल्या आहेत. फ्रीजमधील पाण्यापेक्षा माठातील पाणी आरोग्यासाठी चांगले असते. पर्यायाने थंड पाण्यासाठी फ्रीजऐवजी लाल किंवा काळ्या माठाला मागणी वाढली आहे. फलटण परिसरात अनेक कुंभार आपापल्या घराभोवती माठाची तयारी करीत असून, त्यावर शेवटचा हात फिरवत आहेत. या माठाची मागणी गरीब, मध्यमवर्गीय तसेच सरबत विकणाऱ्या विक्रेत्यांकडूनही होत आहे.

माठ बनविण्यासाठी काळ्या किंवा पांढऱ्या चिकट मातीचा वापर केला जातो; मात्र, ही माती घेण्यासाठी आता कर लागू झाल्याने मातीची किंमत वाढली असून, त्याचा फटका या व्यवसायालाही बसला आहे. अर्थातच यामुळे माठाच्या किमतीमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. याबरोबरच माठ बनविणाऱ्या कुशल कामगारांचीही आता वानवा जाणवू लागली आहे. पारंपरिक पद्धतीने माठ बनवणे ही एक कला आहे. मात्र, खेड्यांमधूनसुद्धा या व्यवसायाकडे कामगारांनी पाठ फिरवली आहे. मात्र, असे असले तरी, या व्यवसायात टिकून राहण्यासाठी कुंभार व्यावसायिकांनी आधुनिकतेचा स्वीकार केला आहे.

नवीन पद्धतीचे, आकर्षक असे तोटी असलेले माठ, मातीची भांडी, ताट-वाट्या, अन्न शिजवण्यासाठीचे मडके, सुरई असे प्रकार बाजारात आणले आहेत. अनेक ठिकाणी फॅशन म्हणून या भांड्यांचा वापर केला जात आहे. ग्राहकांची मागणी विचारात घेऊन त्यापद्धतीने पारंपरिक आणि आधुनिकतेचा मध्य साधून या व्यवसायातील लोक काम करीत आहेत. गतवर्षी ५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत माठांची विक्री झाली होती; मात्र आता त्याचे भाव सर्वत्रच वाढल्याचे दिसते आहे.

चौकट

नवीन पिढी दुसऱ्या व्यवसायात!

नवीन पिढी दुसऱ्या व्यवसायात कुंभारवाड्यात माठ बनविणारे परंपरागत कुंभार असले, तरी नवीन पिढी मात्र आता दुसऱ्या व्यवसायात उतरू लागली आहे. घरच्यांची मदत माठ बनविणाऱ्यांना व्हायची; मात्र नवीन पिढी इतर व्यवसायात जात असल्याने जमेल तेवढे माठ, रांजण बनवून विकण्यात कुंभार मग्न आहेत.

(चौकट)

थंडे का बाजार थंड!

सध्या कोरोनामुळे सर्वत्र आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे माठ विक्री करणाऱ्यांची मोठी अडचण होत असून, त्यांचा ग्रामीण भागातला विक्रीचा व्यवसाय बंद झाला आहे. फलटण शहरात जिथे जागा मिळेल तिथे भर उन्हात ते माठ विक्री करताना दिसत आहेत.

०२फलटण

फलटण शहरात माठांची आवक झाली असून, माठाला ग्रामीणसह शहरी भागातही मागणी वाढली आहे. (छाया : नसीर शिकलगार)

Web Title: Almost ready to build a field in Phaltan Pottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.