काळचौंडी येथील बौद्धविहारात आंबेडकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:06+5:302021-04-15T04:38:06+5:30
वरकुटे-मलवडी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून रात्रं-दिवस कष्ट झेलत ...
वरकुटे-मलवडी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून रात्रं-दिवस कष्ट झेलत दलितांचेच नव्हे तर तमाम बहुजनांचे भविष्य उज्ज्वल केले आहे. बाबासाहेबांची जयंती हा अनमोल आणि खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान म्हणून यादिवशी शिस्तीचे पालन सर्वजण करूया, असे मत म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी व्यक्त केले.
काळचौंडी (ता. माण) येथील बौद्धविहारामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच स्वाती बनसोडे, पोलीस काॅन्स्टेबल अभिजीत भादुले, पोलीस काॅन्स्टेबल इरफान मुजावर, मिलिंद बनसोडे, सत्यवान बनसोडे, राजू बनसोडे, मुकेश बनसोडे, सुरेश बनसोडे, मीनाताई बनसोडे, सुवर्णा बनसोडे, उषाताई बनसोडे, आदी बौद्ध बांधवांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी धनंजय माने-पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या कडक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन उपस्थित सर्वांनी सामुदायिकरित्या त्रिसरण, पंचशील ग्रहण करत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकरांना मनोभावे अभिवादन केले. यावेळी बौद्धबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो आहे : काळचाैंडी (ता. माण) येथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.