पालिकेतर्फे रुग्णवाहिका, शववाहिकेची सोय : निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:39 AM2021-04-16T04:39:15+5:302021-04-16T04:39:15+5:30
फलटण : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाग्रस्त रुग्णांना गुढीपाडवा व नववर्ष प्रारंभदिनी फलटण नगर परिषदेने रुग्णवाहिका आणि शववाहिका सेवा ...
फलटण : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाग्रस्त रुग्णांना गुढीपाडवा व नववर्ष प्रारंभदिनी फलटण नगर परिषदेने रुग्णवाहिका आणि शववाहिका सेवा उपलब्ध करून केल्याचे सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार १४ व्या वित्त आयोग निधीतून सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून खरेदी केलेल्या फोर्स कंपनीच्या रुग्णवाहिका व शववाहिका या दोन नवीन वाहनांचे पूजन व लोकार्पण संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नगरपालिकेत करण्यात त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन व विद्यमान नगरसेवक रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगर परिषद आरोग्य समिती सभापती सनी अहिवळे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती ॲड. मधुबाला भोसले, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका वैशालीताई चोरमले, रंजनाताई कुंभार, प्रगतीताई कापसे, वैशालीताई अहिवळे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णाथ ऊर्फ दादासाहेब चोरमले, राहुल निंबाळकर, मुख्याधिकारी प्रसाद काटकर व त्यांचे सहकारी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
फोटो आहे : फलटण येथे रुग्णवाहिका आणि शववाहिकेचे लोकार्पण झाले. यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, प्रसाद काटकर,नंदकुमार भोईटे,पांडुरंग गुंजवटे उपस्थित होते.