निढळकरांच्या सेवेसाठी आता रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:19+5:302021-05-28T04:28:19+5:30
पुसेगाव : जीडी फाउंडेशन निढळचे अध्यक्ष उद्योजक गजानन खुस्पे यांनी गावासाठी स्वखर्चाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान ...
पुसेगाव : जीडी फाउंडेशन निढळचे अध्यक्ष उद्योजक गजानन खुस्पे यांनी गावासाठी स्वखर्चाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गावातील रुग्णांना दवाखान्याला वेळेत पोहोचविल्यास रुग्णांचे प्राण वाचू शकतात. सद्य:स्थितीत निढळसह परिसरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत, त्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी स्वखर्चातून गावच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलीकडे काहींची प्रकृती अचानक बिघडली तर अशा वेळी रुग्णवाहिका अत्यंत गरजेची असते. अशी रुग्णवाहिका गावात असावी व त्याचा वापर निढळसह परिसरातील प्रत्येक नागरिकाला व्हावा, असे गजानन खुस्पे यांच्या मनात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता एक रुग्णवाहिका घेऊन ती गावाला भेट दिली आहे.