वाठार स्टेशन आरोग्य केंद्राला मिळाली रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:27 AM2021-05-31T04:27:54+5:302021-05-31T04:27:54+5:30

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका द्या, अशी वेळोवेळी मागणी करूनही वाठार स्टेशनला रुग्णवाहिका ...

Ambulance received by Wathar Station Health Center | वाठार स्टेशन आरोग्य केंद्राला मिळाली रुग्णवाहिका

वाठार स्टेशन आरोग्य केंद्राला मिळाली रुग्णवाहिका

Next

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका द्या, अशी वेळोवेळी मागणी करूनही वाठार स्टेशनला रुग्णवाहिका दिली जात नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आता वेगळ्या भाषेत सांगण्याची वेळ आली आहे, असा संताप फलटण कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना क्षेत्रप्रमुख अमोल आवळे यांनी व्यक्त करताच वाठार प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिका मिळाली असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मोठ्या लोकसंख्येचे गाव, तसेच मोठी बाजारपेठ असलेल्या कोरगाव तालुक्यातील वाठार स्टेशनला येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रात सतत गर्दी असते. या रस्त्यावर सतत अपघात होत असतात, अशी परिस्थिती असतांना गेल्या दोन वर्षांपूर्वी येथील रुग्णवाहिका पेटली होती. तेव्हापासून या केंद्रास रुग्णवाहिका मिळावी, यासाठी अनेकजण प्रयत्न करीत होते. दोन दिवसांपूर्वी फलटण, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना क्षेत्र प्रमुख अमोल आवळे यांनी वाठार प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका मिळाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन वाठार आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका देण्यात आली.

Web Title: Ambulance received by Wathar Station Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.