रुग्णवाहिकेमुळे आरोग्य सुविधा गतिमान : राजेंद्र तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:47 AM2021-09-08T04:47:18+5:302021-09-08T04:47:18+5:30
खंडाळा : ‘ग्रामीण भागातील रुग्णांना अधिकचे उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका वितरित करण्यात आली आहे. यापुढील काळात गावातील रुग्णांना यामुळे ...
खंडाळा : ‘ग्रामीण भागातील रुग्णांना अधिकचे उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका वितरित करण्यात आली आहे. यापुढील काळात गावातील रुग्णांना यामुळे दिलासा मिळून आरोग्य सुविधा गतिमान होईल,’ असे मत सभापती राजेंद्र तांबे यांनी व्यक्त केले.
कोरोनाचा भविष्यातील धोका ओळखून खंडाळा तालुक्यातील केसुर्डी गावाला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. त्याचे लोकार्पण सभापती राजेंद्र तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, कंपनी व्यवस्थापक विजय यादव, मनीषसिंग दीक्षित, चंद्रकांत वारूनगसे, सुहास डोईफोडे, प्रज्योत देशपांडे, दिनेश दिघे, तन्मय मोरे, सरपंच गणेश ढमाळ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना कोरोनाच्या उपचारासाठी इतरत्र हलवावे लागते. आता रुग्णवाहिकेच्या सुविधेमुळे अत्यवस्थ रुग्णांना लवकर उपचार मिळण्यास मदत होणार आहे. गावात रुग्णवाहिकेअभावी येणाऱ्या अडचणी दूर होऊन कामकाज करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. केसुर्डी गावात ७०० लोकांना मोफत लसीकरण करण्यात आले; त्यामुळे कोरोनाशी सामना करण्यासाठी मोठी मदत झाली आहे. या उपक्रमामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. यापुढे गावपातळीवर विविध उपक्रम राबवून लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही सरपंच गणेश ढमाळ यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी दशरथ ढमाळ, नवनाथ ढमाळ, शामराव ढमाळ, जगन्नाथ शेंडगे, जनार्दन कोळपे, प्रमोद जाधव, शिवाजी ढमाळ, सागर ढमाळ, सचिन ढमाळ, हरिश्चंद्र जाधव, दत्तात्रय ढमाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.