अमेरिकन वेबसाइटला ‘ठोसेघर’ची भुरळ

By admin | Published: June 28, 2015 11:38 PM2015-06-28T23:38:59+5:302015-06-28T23:38:59+5:30

संचालकांची भेट : व्यवस्थापनाबद्दल गौरव

The American website is inspired by the "Choseghar" | अमेरिकन वेबसाइटला ‘ठोसेघर’ची भुरळ

अमेरिकन वेबसाइटला ‘ठोसेघर’ची भुरळ

Next

परळी : ठोसेघर ता. सातारा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीला अमेरिकेतील ड्रोम अ‍ॅडव्हायझर या जगविख्यात वेबसाईटने उत्कृष्ट कामकाजाचे अ‍ॅवॉर्ड (प्रमाणपत्र) पोस्टाने पाठवुन दिल्यामुळे पुन्हा एकदा ठोसेघरचा धबधबा जगभरामध्ये परिचित झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.कास पठाराची जागतिक वारसा म्हणून जगाच्या नाकाशात नोंद झाल्यानंतर जगभरातील अनेक जगविख्यात वेबसाईटची भुरळ ठोसेघरवर पडली आहे. अमेरिकेतील ड्रोम अ‍ॅडव्हायझर या वेबसाईटच्या संचालकांनी २०१४ मध्ये पावसाळी हंगामात ठोसेघरला भेट देवून धबधबा तसेच पाठसराची पाहणी केली
होती. ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समितिच्या माध्यमातुन देण्यात येणाऱ्या सोय-सुविधांचाही सखोल अभ्यास केला होता. धबधब्याकडे जाण्यास बांधण्यात आलेली रेली, प्रेक्षा गॅलरी, पेव्हर ब्लॉकचे रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसण्यासाठी सिमेंटची बाके, या सर्व गोष्टींची संचालकांनी दखल घेतली होती. त्यावेळी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केली.
धबधबा परिसराचे व्यवस्थापन कसे केले जाते याची इतिवृत्तंत माहिती घेतली होती.
एक वर्षापूर्वी मुंबई येथील एका संस्थेने ठोसेघर धबधब्यावर झुलता पुल होण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार त्यांनी पाहणी करुन येणाचा खर्चही तयार केला होता.
हे अराखडा वनविभागाकडे सादर करण्यात आला आहे. यावर लोक प्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रयत्न
सुरू केले असून बहुदा पुढील
वर्षी पर्यटकांना झुलत्या पुलाचा आनंद अनुभवयाला येणार
आहे. (वार्ताहर)

दुर्मिळ फुलांमुळे कास पठाराची ओळख अत्यंत कमी वेळात जगात झाली होती. कासनंतर ठोसेघर धबधब्याची आणि तेथे करण्यात येणाऱ्या व्यवस्थापनाची दखल ड्रोम अ‍ॅडव्हायझरसारख्या वेबसाईटने ही बाब निश्चितच जिल्ह्यासाठी भुषणावह आहे.
- जयराम चव्हाण,
सरपंच ठोसेघर

Web Title: The American website is inspired by the "Choseghar"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.