कराडमध्ये अमोनिया टाकीचा स्फोट

By admin | Published: June 27, 2017 04:08 PM2017-06-27T16:08:22+5:302017-06-27T16:08:22+5:30

शहरातील कोल्हापूर नाक्यापासून काही अंतरावर अमोनिया टाकीचा मोठा स्फोट झाला.

Ammonia tank explosion in Karad | कराडमध्ये अमोनिया टाकीचा स्फोट

कराडमध्ये अमोनिया टाकीचा स्फोट

Next

 ऑनलाईन लोकमत 

सातारा, दि. 27- शहरातील कोल्हापूर नाक्यापासून काही अंतरावर अमोनिया टाकीचा मोठा स्फोट झाला. तर दुसऱ्या एका टाकीची सुरू झाल्याने परिसरात अमोनिया गॅस पसरला होता. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशामक दल, पोलिस तसेच महामार्ग देखभाल विभागाकडून गॅस गळती रोखण्याचे काम सुरू आहे. कराडमध्ये महामार्गापासून काही अंतरावर अमोनिया गॅसचे वितरण करणारी कंपनी आहे. बर्फ बनविणाऱ्या कंपन्यांना या कंपनीमधून अमोनिया गॅसच्या टाक्यांचे वितरण केले जाते. मंगळवारी दुपारी वितरणासाठी कामगारांनी काही टाक्या बाहेर काढल्या होत्या. त्यावेळी अचानक एका टाकीचा स्फोट झाला. तर दुसऱ्या टाकीतून गळती सुरू झाली. या घटनेमुळे मोठी धावपळ उडाली. स्फोट झालेली टाकी घटनास्थळापासून सुमारे दोनशे फुट अंतरावर जाऊन पडली होती. तसेच मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथक तातडीने त्याठिकाणी पोहोचले असून गॅस गळती काढण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Ammonia tank explosion in Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.