तांबवे ग्रामपंचायतीचा अमृतमहोत्सव

By admin | Published: December 24, 2014 09:57 PM2014-12-24T21:57:08+5:302014-12-25T00:16:02+5:30

स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून तांबवे गावाची पंढरी म्हणून तांबवे गावची ओळख

Amrit Mahotsav of Tambwe Gram Panchayat | तांबवे ग्रामपंचायतीचा अमृतमहोत्सव

तांबवे ग्रामपंचायतीचा अमृतमहोत्सव

Next

तांबवे : तांबवे ग्रामपंचायतीने नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले़ सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या येथील संगम गणेश मंडळाच्या वतीने ग्रामपंचायतीचा अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ उत्साहात झाला.
स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून तांबवे गावाची पंढरी म्हणून तांबवे गावची ओळख आहे़ येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपतींच्या हस्तेही गौरविण्यात आले आहे़ या ग्रामपंचायतीची स्थापना ब्रिटिशांच्या काळात १९ डिसेंबर १९४० साली झाली़ त्यावेळी तांबवेसह साजूर, आरेवाडी, गमेवाडी, डेळेवाडी, पाठरवाडी, मोळेवाडी, उत्तर तांबवे या सर्व गावांचा समावेश या ग्रामपंचायतीत होता. या ग्रामपंचायतीचे पहिले सरपंचपद ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णा बाळा पाटील यांनी भूषविले होते़ या गावातून पुढे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नेतृत्व तयार झाले़ स्वयंभू ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक कामे उभी राहिली आहेत़ या ग्रामपंचायतीने नुकतेच ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे़ त्याबद्दल संगम गणेश मंडळाने ७५ व्या वर्षाचा शुभारंभ माजी जि. प. सदस्य व माजी सरपंच द़ धो़ पाटील, शंकरराव पाटील, माजी जि. प. सदस्या विजया पाटील, इंदूताई पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व केक कापून करण्यात आला़ यावेळी अ‍ॅड़ विजयसिंह पाटील, पी़ एम़ पवार, अशोकराव पाटील, विकास पाटील, नंदकुमार बागवडे, विलास पाटील, भरत पाटील, विक्रम पाटील, हणमंत कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते़ शंकर ताटे, स्वप्नील पाटील यांनी स्वागत केले़ अनिल बाबर यांनी आभार मानले़ कार्यक्रमासाठी आबासाहेब पाटील, नितीन पवार, सूरज पाटील, अक्षय पाटील, धीरज पाटील, सुरेश फिरंगे, किरण झोंबाडे, विजय पाटील, सौरभ देसाई, मंगेश पवार यांनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)

Web Title: Amrit Mahotsav of Tambwe Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.