अमृता कायगुडे यांची सहायक सचिवपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:30 AM2021-02-19T04:30:08+5:302021-02-19T04:30:08+5:30
पुसेगाव : अमृता राजेंद्र कायगुडे यांची महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवेत सहायक सचिव पदावर निवड झाली आहे. सद्य:स्थितीत त्या महावितरण ...
पुसेगाव : अमृता राजेंद्र कायगुडे यांची महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवेत सहायक सचिव पदावर निवड झाली आहे. सद्य:स्थितीत त्या महावितरण कंपनीत सहायक अभियंता म्हणून भुसावळ येथे कार्यरत आहेत. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे यांच्या त्या कन्या तर वेटणे, ता. खटाव येथील उद्योजक मनोज नलावडे यांच्या त्या भाची होत. अमृता कायगुडे यांचे शालेय शिक्षण साताऱ्यातील मोना स्कूलमध्ये झाले. पुढे यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. इस्लामपूरच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधून बीई पदवी चांगल्या गुणांनी संपादन केली. २०१८ मध्ये त्यांची महावितरण कंपनीत सहायक अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर कार्यरत राहत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली व त्यात त्यांनी बाजी मारली. राज्यपालांच्या आदेशाने त्यांची महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळावर सहायक सचिव म्हणून नियुक्ती झाली. यशाबद्दल गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.