सातारा: रुग्ण घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून गाडी उलटली, सुदैवाने सहाजण बचावले

By जगदीश कोष्टी | Published: October 21, 2022 06:34 PM2022-10-21T18:34:22+5:302022-10-21T18:34:41+5:30

मध्यरात्रीच्या सुमारास निसरे फाटा येथे झाला अपघात

An ambulance carrying a patient overturned after its tire burst, luckily six people survived in satara | सातारा: रुग्ण घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून गाडी उलटली, सुदैवाने सहाजण बचावले

सातारा: रुग्ण घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून गाडी उलटली, सुदैवाने सहाजण बचावले

Next

मल्हारपेठ : पाटणहून कऱ्हाडला रुग्ण घेऊन निघालेल्या १०८ या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने दुभाजकला धडकली. त्यानंतर गाडी पलटी झाली. सुदैवाने या अपघातातून सहाजण सुखरूप बचावले. हा अपघात काल, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास निसरे फाटा येथे झाला.

याबाबत माहिती अशी की, पाटण येथील ग्रामीण रुग्णालयामधून पिंपळोशी येथील अपघात झालेल्या रुग्णास घेऊन रुग्णवाहिका कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलकडे निघाली होती. दरम्यान निसरे फाटा येते भरधाव रुग्णवाहिकेचा मागील टायर फुटला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यात मागील बाजूचा टायरचा भाग तुटल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन रस्त्याच्या मधोमध घसरत गेली. रुग्णवाहिकेत रुग्णाबरोबर आलेले नातेवाईक डॉक्टर व चालक असे सहाजण होते.

अचानक मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. तसेच रुग्णवाहिकेतील सहा जणांना बाहेर काढले. यामध्ये काहींना किरकोळ इजा झाली. यानंतर उब्रज येथील दुसऱ्या रुग्णवाहिकेस बोलवण्यात आले. यावेळी मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Web Title: An ambulance carrying a patient overturned after its tire burst, luckily six people survived in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.