वाईमध्ये सराफ कारागिराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले
By दीपक शिंदे | Updated: July 29, 2024 00:09 IST2024-07-29T00:09:42+5:302024-07-29T00:09:59+5:30
घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

वाईमध्ये सराफ कारागिराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क, वाई : वाईतील धर्मपुरी येथील सराफपेढीमध्ये काम करत असलेल्या कारागिरांना रविवारी रात्री दहाच्या सुमारास कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
वाईतील मुख्य बाजारपेठ असलेल्या धर्मपुरी परिसरातील एका दुकानात सुवर्ण कारागिर रविवारी रात्री काम करत बसले होते. यावेळी तेथे दुचाकीवरुन दोघेजण आले. त्यांनी या कारागिरांना पिस्तुल आणि कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचा ऐवज घेऊन पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संबंधित कारागिरांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.