साताऱ्यात पोलीस असल्याचे भासवून वृद्धेला लुटले, सव्वाचार लाखांचे दागिने लांबबिले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 03:30 PM2022-07-27T15:30:26+5:302022-07-27T15:30:50+5:30

तिघा भामट्यांनी हातचलाखी करून दागिने पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून घेऊन गेले

An old woman was robbed by pretending to be the police in Satara, jewelery worth 10 lakhs was stolen | साताऱ्यात पोलीस असल्याचे भासवून वृद्धेला लुटले, सव्वाचार लाखांचे दागिने लांबबिले

साताऱ्यात पोलीस असल्याचे भासवून वृद्धेला लुटले, सव्वाचार लाखांचे दागिने लांबबिले

Next

सातारा : वयोवृद्धांना गंडवणाऱ्या टोळीचे कारनामे सातत्याने समोर येत असून, सातारा शहरातील गजबजलेल्या यादोगोपाळ पेठेमध्ये एका वृद्धेला पोलीस असल्याचे भासवून तब्बल सव्वाचार लाखांचे दागिने हातचलाखी करून चोरून नेले. ही धक्कादायक घटना काल मंगळवारी (दि.२६) घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिल्पा प्रमोद शहाणे (वय ७२, रा. मंगळवार पेठ, सातारा) या मंगळवार, दि. २६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मंगळवार तळ्यावर उपासनेसाठी निघाल्या होत्या. गोल मारुती मंदिरापासून पुढे चालत गेल्यानंतर तीन तरुण तेथे आले. ‘आम्ही पोलीस आहोत, गस्त सुरू आहे. एवढे दागिने कशाला घातलेत काढा, हे दागिने आम्ही व्यवस्थित ठेवू’ असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे शहाणे यांना हे खरोखरचे पोलीस असल्याचे वाटले. त्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील सोन्याच्या बांगड्या असे पाच तोळ्यांचे ४ लाख २५ हजार रुपयांचे दागिने तोतया पोलिसांजवळ काढून दिले. संबंधित तिघा भामट्यांनी हातचलाखी करून दागिने पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून घेऊन गेले. या प्रकारानंतर शिल्पा शहाणे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Web Title: An old woman was robbed by pretending to be the police in Satara, jewelery worth 10 lakhs was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.