काँग्रेसमधून ‘आनंद’ गायब अन् पृथ्वी‘राज’ धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:59 PM2019-09-10T23:59:56+5:302019-09-11T00:00:00+5:30

प्रमोद सुकरे । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : कोणाला स्वप्नातही वाटणार नाही अशा प्रकारची घडामोड कºहाडमध्ये घडली. पक्षांतर्गत कुरबुरीमुळे ...

'Anand' disappears and Congress threatens 'Prithvi' from Congress! | काँग्रेसमधून ‘आनंद’ गायब अन् पृथ्वी‘राज’ धोक्यात !

काँग्रेसमधून ‘आनंद’ गायब अन् पृथ्वी‘राज’ धोक्यात !

Next

प्रमोद सुकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : कोणाला स्वप्नातही वाटणार नाही अशा प्रकारची घडामोड कºहाडमध्ये घडली. पक्षांतर्गत कुरबुरीमुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे मिनी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणारे आनंदराव पाटील अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. काँग्रेसमधून आनंदराव पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने आता कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकारण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आनंदराव पाटील हे चव्हाण कुटुंबीयांचे निष्ठावंत पाईक म्हणून ओळखले जातात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर आनंदरावांचा भाव चांगलाच वाढला होता. मिनी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. निष्ठेचे फळ म्हणून त्यांना विधान परिषदेचे आमदार होण्याची संधीही मिळाली. या सर्व बाबींचा आनंदराव पाटील यांना भविष्यातील वाट चोखाळताना विचार करावा लागणार आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना एका वेगळ््या रांगेत बसविले पण आता छोट्या मोठ्या मानापमान नाट्याने मागच्या दिवसांची आठवण न ठेवता पुढचा भविष्यकाळ अडचणीचा ठरू शकतो. ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ नये म्हणजे झाले.
सातारा जिल्ह्यातही काँग्रेसची मोठी पडझड झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी धक्का दिला. ते आता भाजपचे खासदार आहेत. तर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनीही काही दिवसांपूर्वीच हातात कमळ घेतले आहे. आता पक्षातील पृथ्वीराज चव्हाण समर्थक असलेल्या काहींकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने आनंदराव पाटील व त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. त्यामुळे आनंदराव पाटील नवी वाट चोखाळतील, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, सोमवारी आमदार आनंदराव पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी डॉ. अतुल भोसलेही उपस्थित होते. हा योगायोग होता, असे म्हणता येणार नाही. त्यातच त्यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. साहजिकच त्यामुळे पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. मात्र, आनंदराव पाटील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन दिशा ठरविणार असल्याचे सांगताहेत.

भोसलेंची खेळी फायद्याची की तोट्याची?
आमदार आनंदराव पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट घालून देऊन डॉ. अतुल भोसलेंनी मोठी खेळी केल्याचे त्यांचे समर्थक सांगतात; पण क्रिया आली की प्रतिक्रिया ही येतेच. याप्रमाणे भोसलेंची ही खेळी फायद्याची की तोट्याची, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
मनधरणीचे प्रयत्न...
आमदार आनंदराव पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मंगळवारी दिवसभर पाटलांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. त्यातच काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील आदींनी भ्रमणध्वनीवरून आनंदराव पाटील यांच्याशी संपर्क करून पक्षांतर्गत वाद मिटवू, असे सांगून मनधरणीचे प्रयत्न सुरू केल्याचे निकटवर्तीय सांगतात.
मनोहारी मार्ग सुकर होईल...
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाने एकत्र येण्याची गरज काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. मात्र, त्यात आमदार आनंदराव पाटील काहींना अडसर वाटत होते. आनंदराव पाटलांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तर पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या मनोमिलनाचा ‘मनोहारी’ मार्ग सुकर होईल, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: 'Anand' disappears and Congress threatens 'Prithvi' from Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.