आनंदराव चव्हाण पतसंस्था कऱ्हाडकरांच्या विश्वासास पात्र : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:36 AM2021-04-19T04:36:10+5:302021-04-19T04:36:10+5:30

मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कऱ्हाड येथील मार्केट यार्ड शाखेच्या वतीने धनाजी पाटील यांना ...

Anandrao Chavan Patsanstha deserves the trust of Karhadkar: Patil | आनंदराव चव्हाण पतसंस्था कऱ्हाडकरांच्या विश्वासास पात्र : पाटील

आनंदराव चव्हाण पतसंस्था कऱ्हाडकरांच्या विश्वासास पात्र : पाटील

Next

मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कऱ्हाड येथील मार्केट यार्ड शाखेच्या वतीने धनाजी पाटील यांना वाहनाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पृथ्वीराज पाटील, पंकज शेवाळे, अवधूत पाटील, आशिष पाटील, शाखाप्रमुख सुनील गिरिगोसावी, सर्जेराव धस, नीलेश काळे, सुरेश पाटील, संजय सावंत उपस्थित होते.

अभिजित पाटील म्हणाले, या शाखेने १२ कोटी ७५ लाख ८३ हजार ठेवी जमा करून ८ कोटी ७० लाख ४८ हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेने जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करून सभासद व ठेवीदारांचा विश्वास संपादन केला. सुशिक्षित युवकांना आर्थिक साहाय्य करून स्वत:च्या पायावर उभे केले असून, संस्थेने आर्थिक व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.

सुनील गिरीगोसावी यांनी स्वागत केले; तर नीलेश काळे यांनी आभार मानले. (वा. प्र.)

फोटो : १८केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाड-मार्केट यार्ड येथील आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या वतीने वाहन वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील उपस्थित होते.

Web Title: Anandrao Chavan Patsanstha deserves the trust of Karhadkar: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.