अंधारी-कोळघर रस्ता डांबरीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:34 AM2021-01-18T04:34:53+5:302021-01-18T04:34:53+5:30
बामणोली : अंधारी ते कोळघरपासून पुढे कुसुंबी मेढा हा रस्ता अंधारी गावात सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत अत्यंत खराब झाला ...
बामणोली : अंधारी ते कोळघरपासून पुढे कुसुंबी मेढा हा रस्ता अंधारी गावात सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत अत्यंत खराब झाला होता. एवढा खराब भाग सोडला तर पुढील रस्ता मात्र कुसुंबीपर्यंत चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणचे पर्यटक पाचवडहून मेढा मार्गे पर्यटनासाठी बामणोलीला येत आहे. या मार्गामुळे अंतर व वेळेची बचत होत आहे. सध्या वासोटा ट्रेकिंगसह शिवसागर जलाशयात जलपर्यटनासाठी हजारो पर्यटक बामणोली परिसरात येत आहेत. शिवाय या परिसरातील स्थानिकांनाही मेढा या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचण्यास हा मार्ग खूपच सोयीस्कर ठरतो. या मार्गावर प्रत्यक्ष खडीकरणास व डांबरीकरणास प्रारंभ झाल्याने अंधारी ग्रामस्थांसह स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
१७बामणोली
अंधारी-कोळघर रस्ता डांबरीकरणास प्रारंभ करण्यात आल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.