गाव पूर्ण बंद : मुंबईहून आलेल्याच्या संपर्कातील महिलेलाही बाधा - अंदोरीत एकापाठोपाठ दुसराही बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:25 PM2020-05-26T22:25:52+5:302020-05-26T22:27:26+5:30
रुग्णालयात दाखल करून स्त्रावाचे नमुने घेतले असता तो कोरोना बाधित आढळून आला. त्यानंतर त्याच कुटुंबातील त्यांच्या संपर्कातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.या घटनेमुळे अंदोरी परिसरात खळबळ उडाली असून, ही माहिती मिळताच गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, डॉ. अविनाश पाटील परिसर सील केला.
खंडाळा : अंदोरी येथील कांचनवस्ती येथे कुर्ला मुंबईहून कुटुंबासह आलेला पुरुष कोरोना बाधित आढळला असतानाच त्यांच्या संपर्कातील आणखी एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अंदोरीमध्ये एका पाठोपाठ दोन रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने गाव पूर्णपणे बंद केले असून, गावाचा कंटेन्मेंट झोनमध्ये समावेश केला आहे.
अंदोरी येथे मुंबई कुर्ला येथून आठ दिवसांपूर्वी अंदोरीत आलेल्या एका कंपनी कामगारास ताप आणि खोकला येत होता. स्थानिक डॉक्टरांकडून तपासणी व उपचार घेतले. मात्र ताप वाढल्याने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले. तपासणीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून स्त्रावाचे नमुने घेतले असता तो कोरोना बाधित आढळून आला. त्यानंतर त्याच कुटुंबातील त्यांच्या संपर्कातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.या घटनेमुळे अंदोरी परिसरात खळबळ उडाली असून, ही माहिती मिळताच गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, डॉ. अविनाश पाटील परिसर सील केला.
एकोणीस जण क्वॉरंटाईन
बाधित रुग्णाच्या संपर्कातील आठजणांना शिरवळ येथे क्वॉरंटाईन करण्यात आले तर लोरिस्क संपर्कात आलेल्या १९ जणांना घरातच क्वॉरंटाईन केले आहे. आरोग्य विभागाने तयार केलेल्या पथकांचे घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. मात्र या आठ लोकांच्या अहवालाकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.