अंगणवाडी सेविकांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:10+5:302021-07-30T04:40:10+5:30

कुकुडवाड : अखिल भारतीय मजदूर संघाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना काळात जीवाची पर्वा न करता नाविन्यपूर्ण व ...

Anganwadi workers honored as Corona Warrior | अंगणवाडी सेविकांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव

अंगणवाडी सेविकांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव

Next

कुकुडवाड : अखिल भारतीय मजदूर संघाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना काळात जीवाची पर्वा न करता नाविन्यपूर्ण व आदर्शवत सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी एकात्मिक बालविकास योजनेच्या जिल्हा पर्यवेक्षिका माधुरी कुलकर्णी, तुषार कुलकर्णी, श्रीराम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसाद हुद्देदार, विजय काशीद उपस्थित होते. भारतीय मजदूर संघाचे जिल्हा प्रतिनिधी जयंत शेटे यांनी प्रास्ताविक केले व भारतीय मजदूर संघाच्या कार्यपद्धतीबद्दल उपस्थितांना माहिती दिली. गेल्या ६६ वर्षांमधील संघाचे कार्य व सध्या मजदूर संघाच्यावतीने कोरोना काळात शासनाकडून मजुरांसाठी मंजूर केलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी अंगणवाडी सेविकांचे मागील वर्षातील विशेष मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी एकमुखाने केली. या कार्यक्रमाला उपस्थित अंगणवाडी सेविकांबरोबरच लसीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विजय काशीद यांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. भारतीय मजदूर संघाचे माण तालुका प्रतिनिधी जावेदखान मुलाणी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलीबाबा नदाफ, सुनील सुतार व संजय रणसिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

290721\img-20210728-wa0005.jpg

कुकुडवाड येथे अंगणवाडी सेविकांचा कोरोनायोध्दा म्हणून सन्मान

Web Title: Anganwadi workers honored as Corona Warrior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.