अंगणवाड्या बनल्या स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:19+5:302021-04-12T04:36:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तरडगाव : स्पर्धेच्या युगात शैक्षणिक पद्धतीत बदल होत आहे. बहुतांश शाळा डिजिटल झाल्या असतानाच आता अंगणवाड्याही ...

Anganwadis became smart | अंगणवाड्या बनल्या स्मार्ट

अंगणवाड्या बनल्या स्मार्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

तरडगाव : स्पर्धेच्या युगात शैक्षणिक पद्धतीत बदल होत आहे. बहुतांश शाळा डिजिटल झाल्या असतानाच आता अंगणवाड्याही स्मार्ट होत आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत फलटण तालुक्यात तर ४० अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी संच देण्यात आला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे याचा लाभ सध्या घेता येणार नाही. मात्र, भविष्यात मुलांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

'आई माझं पत्र हरवलं, ते मला सापडलं ', हा अंगणवाडीत बाल अवस्थेतील एका खेळातील प्रकार प्रत्येकाला बालपणाची आठवण करून देतो. या वयातील शिक्षण खरं तर मुलांवर चांगले संस्कार करणारं समजलं जात होतं. तर मुलांना मुळाक्षरांची ओळख होत असतानाच गाणी, गोष्टी, गप्पा असे विविध उपक्रम खेळाच्या स्वरूपात अंगणवाडीसेविका शिकवत. सध्या काळानुरूप शैक्षणिक पद्धती बदलत आहे. आता शाळाबरोबर अंगणवाड्या कात टाकू लागल्या आहेत. त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प फलटण १ मधील २० अंगणवाड्या व प्रकल्प फलटण २ मधील २० अंगणवाड्या अशा ४० अंगणवाड्यांना विविध उपकरणे असणारे स्मार्ट अंगणवाडी संच देण्यात आले आहेत.

अंगणवाडीच्या इमारती स्वतंत्र व सुस्थितीत आहेत. मुलांची उपस्थिती चांगली आहे, अशा अंगणवाडींची निवड करण्यात आली आहे.

तालुक्यातील प्रत्येक केंद्रासाठी पुढीलप्रमाणे स्मार्ट अंगणवाडी संच दिले आहेत. तरडगाव केंद्रांसाठी तीन संच दिले आहेत. पाडेगाव केंद्रासाठी ३, साखरवाडी २, निंभोरे २, खुंटे ३, विडणी २, सोमंथळी ३, राजाळे २, आसू ५, बरड ३, जावली २, दुधेबावी २, गिरवी ४, ढवळ २, कोळकी २ याप्रमाणे संच पुरवठा केला आहे. तसेच दरवर्षी ग्रामपंचायतीच्या १४व्या वित्त आयोगातील काही ठराविक टक्के निधी हा अंगणवाडीच्या विकासासाठी दिला जातो. त्यातून तो अत्यावश्यक बाबींवर खर्च केला जात असतो. तालुक्यातील ४० अंगणवाड्यांना हे संच देण्यात आले आहेत.

कोट :

सध्या कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती भयानक आहे. यामुळे अंगणवाडीत सध्या विद्यार्थी अनुपस्थित असले तरी कोरोनाचे संकट संपून जेव्हा सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल. तेव्हा या स्मार्ट अंगणवाडीतून मुलांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देता येणार आहे.

- भरत कोळेकर,

प्रकल्प अधिकारी

एकात्मिक बालविकास फलटण

फोटो ओळ : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत फलटण तालुक्यातील विविध केंद्रांतील ४० अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी संच देण्यात आला आहे. (छाया : सचिन गायकवाड)

Web Title: Anganwadis became smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.