शिरवळमधील कोरोनाबाधित रुग्णांसाठी धावले देवदूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:42 AM2021-05-06T04:42:20+5:302021-05-06T04:42:20+5:30

मुराद पटेल शिरवळ : वेळ मध्यरात्री २ वाजताची... शिरवळ ता.खंडाळा येथील एका खासगी रुग्णालयामध्ये २० मिनिटे पुरेल इतकाच ...

Angels rushed for coronary heart disease patients! | शिरवळमधील कोरोनाबाधित रुग्णांसाठी धावले देवदूत!

शिरवळमधील कोरोनाबाधित रुग्णांसाठी धावले देवदूत!

Next

मुराद पटेल

शिरवळ : वेळ मध्यरात्री २ वाजताची... शिरवळ ता.खंडाळा येथील एका खासगी रुग्णालयामध्ये २० मिनिटे पुरेल इतकाच ऑक्सिजनचा पुरवठा असलेला एकच सिलिंडर.. युद्धजन्य परिस्थिती. यावेळी मृत्यूशी झुंज देत असलेल्या एका खासगी रुग्णालयामध्ये असणाऱ्या ३० कोरोनाबाधित रुग्णांसाठी शिरवळमधील मुस्लीम युवक देवदूत ठरले.

कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये रुग्णांच्या संख्येचा नवा उच्चांक दररोज घडत इतिहास घडत आहे. सातारा जिल्हा प्रशासनाकडून कुरण रोगाला प्रतिबंध करण्याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना, प्रशासनावर वाढत्या संख्येमुळे अत्यावश्यक सोईसुविधा पुरवताना तारेवरची कसरत करताना दिसत आहे. त्यामध्येच शिरवळ, ता.खंडाळा येथील एका खासगी रुग्णालयामध्ये मध्यरात्री २ वाजता संकटाची घडी उभारली होती. यावेळी ३० रुग्णांना अवघे २० मिनिटे पुरेल, इतकाच एक ऑक्सिजन सिलिंडर बाकी राहिला असताना, ऑक्सिजन सिलिंडर मिळवताना रुग्णालयाच्या प्रशासनाला नाकीनऊ निर्माण झाले होते.

यावेळी रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला तांत्रिक कारणास्तव संपर्क होत नसल्याने, रुग्णालय प्रशासनाबरोबर नातेवाइकांची अवस्था केविलवाणी झाली होती. याप्रसंगी त्या ठिकाणी उपचार घेत असलेले दिवंगत बालमभाई शेख यांचे नातेवाइकांनी भाचे अमजद सय्यद यांना या गोष्टीची कल्पना दिली असता, अमजद सय्यद यांनी तातडीने मित्र असिफ मुजावर यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्यात कल्पना दिली. यावेळी असिफ मुजावर यांनी आपले मित्र साहिलभाई काझी, जावेद बागवान,जावेद नालबंद यांना तातडीने येण्याबाबत सांगत, संबंधितांनी शिरवळ येथील एका पुरवठादाराकडून एका मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून तीन ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करीत तातडीने अवघ्या १० मिनिटांमध्ये संबंधित रुग्णालय गाठले. यावेळी त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत शिल्लक असलेला ऑक्सिजन सिलिंडरही समाप्त होत आलेला होता. यावेळी या युवकांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने युद्धपातळीवर ऑक्सिजन सिलिंडर बदलत ३० रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

दरम्यान, रुग्णांची संख्या पाहता आणलेलं ऑक्सिजन सिलिंडरही तुटपुंजे ठरण्याची शक्यता असल्याने, या युवकांनी पुणे येथील कात्रज या ठिकाणी संपर्क साधत ५ ऑक्सिजन सिलिंडर असल्याचे समजताच, लागलीच कात्रजला धाव घेत अवघ्या ३५ ते ४० मिनिटांमध्ये शिरवळला कात्रजहून परत येत रुग्णालयामध्ये आले असता, पूर्वी आणलेले ३ सिलिंडरही समाप्त होत आल्याचे निदर्शनास आले असता, तातडीने आणलेले ५ ऑक्सिजन सिलिंडरच पुरवठा करत औटघटकेला आलेल्या यमदूतालाही माघारी पाठविण्याचे धाडस शिरवळमधील या युवकांनी केलेल्या कार्यामुळे शक्य झाले. दरम्यान, रुग्णालयामध्ये ३० रुग्णांच्या जिवावर आलेला बाका प्रसंग.. रुग्णालयामध्ये असलेल्या ऑक्सिजन सिलिंडर केवळ औटघटकेचे राहिले असताना युवकांनी आणलेले तीन ऑक्सिजन सिलिंडर ३० रुग्णांकरिता संजीवनी ठरले.

----------------

कोट-

रुग्णालयामध्ये ऑक्सिजन सिलिंडर संपल्याने आमच्या रुग्णांसहित सगळ्यांचे जीव टांगणीला लागले होते. कोणत्याही क्षणी अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याने, आम्ही देव पाण्यात घालूनच बसलो होतो, परंतु देवाच्या रुपाने शिरवळ येथील युवकांनी दाखविलेल्या धाडसामुळे अनेकांचे जीव वाचले.

- नातेवाईक, कोरोनाग्रस्त रुग्ण

कोट..

रुग्णालयामध्ये अवघड प्रसंग निर्माण झाला होता. याबाबतची कल्पना मिळताच, इस्लाममध्ये माणुसकी हा धर्म असून, जीव वाचविणे याच्यासारखे दुसरे कोणतेही पुण्य जगामध्ये नाही, हा उद्देश ठेवून आम्ही केवळ आमचे कर्तव्य पार पाडले आहे. ३० रुग्णांचा जीव वाचविण्यात यश आले, याचे समाधान आहे.

-साहिलभाई काझी व असिफभाई मुजावर, मदत करणारे युवक

फाोटो ०५शिरवळ

छायाचित्र- शिरवळ ता. खंडाळा येथील एका रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवताच, शिरवळमधील युवकांनी धाव घेत, ३० कोरोना रुग्णाकरिता देवदूत ठरले.

Web Title: Angels rushed for coronary heart disease patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.