तहसीलदारचे वाहनचालक ‘त्या’ शेतकऱ्यासाठी देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:53 PM2018-04-26T22:53:05+5:302018-04-26T22:53:05+5:30

 Angels for the 'tahsildar' driver | तहसीलदारचे वाहनचालक ‘त्या’ शेतकऱ्यासाठी देवदूत

तहसीलदारचे वाहनचालक ‘त्या’ शेतकऱ्यासाठी देवदूत

Next


सातारा : गाडीत विष पिलेला व्यक्ती... मरणासन्न अवस्थेत पडलेला.. वेळेत उपचार झाले नाहीत तर जीवच जाणार, या धाकधुकीतच साताºयाचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांचा वाहनचालक अभय पवार वाहतूक कोंडीवर मात करत शासकीय रुग्णालयाच्या दिशेने वाहन नेत होता, एखाद्या चित्रपटातील प्रसंग घडावा, तशी ही परिस्थिती!
त्याचे झाले असे, शेतात जायला रस्ता मिळत नाही आणि महसूल विभागही मागणीची दखल घेत नाही, या विवंचनेत सुनील संपत मोरे (रा. तारगाव, ता. कोरेगाव) या शेतकºयाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातच विषारी औषध पिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सातबारा संगणकीरणाचे काम सुरू आहे, या कामाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांचे चालक अभय पवार (रा. शाहूनगर, ता. सातारा) हे चहा पित होते. तहसीलदार चव्हाण हे कर्मचाºयांना सूचना करत असतानाच काही लोक त्यांच्या दिशेने धावत आले. एका तरुणाने विषारी औषध पिल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदारांच्या आदेशानंतर या तरुणाला त्यांच्याच वाहनात बसविण्यात आले. तहसीलदारांनी चालक अभय पवार यांनाही लागलीच हे वाहन जिल्हा रुग्णालयात नेण्याची सूचना केली.
पाहतात तर वाहनात विषारी औषध पिलेला तरुण. अभय पवार यांनी क्षणाचाही अवधी न घालवता, हे वाहन जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने न्यायला सुरुवात केली. पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे वाहन नेता येणार नाही, हे लक्षात घेऊन पवार यांनी अजिंक्य कॉलनीच्या दिशेने वाहन नेले. तिथून बीएसएनएल कार्यालयाच्या समोरून जिल्हा रुग्णालयाकडे जाणाºया जवळच्या रस्त्याने वाहन नेले. काही वेळातच उपचार सुरू करण्यात डॉक्टरांनाही यश आले. अभय पवार यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे घटनास्थळी कौतुक होत होते.
जीव वाचला यातच समाधान
या तरुण शेतकºयाचा जीव वाचावा, यासाठी वेळ घालवून चालणार नव्हता. रुग्णवाहिका येईपर्यंत जीव जाण्याची भीती होती. पण प्रसंगावधान राखून या तरुणाला उपचारासाठी दाखल केल्याचे समाधान अभय पवार यांच्या चेहºयावर झळकत होते.

Web Title:  Angels for the 'tahsildar' driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.