साथीच्या रोगाने जनावरे दगावली माण तालुका : घटसर्पाची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 09:25 PM2018-09-04T21:25:08+5:302018-09-04T21:25:28+5:30
‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ असं माणसाप्रमाणेच पाळीव जनावरांसाठीही म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. याचा परिणाम अलीकडच्या काही दिवसांत पशुपक्ष्यांमध्येही
सातारा : ‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ असं माणसाप्रमाणेच पाळीव जनावरांसाठीही म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. याचा परिणाम अलीकडच्या काही दिवसांत पशुपक्ष्यांमध्येही दिसू लागला आहे. साथीच्या रोगामुळे गेल्या दीड महिन्यात माण तालुक्यातील ६० हून अधिक जनावरे दगावल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनस्तरावर पशुसंवर्धन विभागाकडून साथीच्या रोगांवर नियंत्रण आण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.
माण तालुक्यात साथीच्या रोगामुळे दगावलेल्या जनावरांमुळे शेतक ऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकºयांनी जनावरांचा गोठा रोज स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे जनावरांना साथीची लागण होणार नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. माणमध्ये दगावलेल्या जनावरांना घटसर्प या रोगांची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविला आहे.
वातावरणातील बदलामुळे साथीचे रोग वाढतात. त्याबरोबरच गोठ्यामधील जनावरांना साथीच्या रोगांची लागण झाली असेल, तर त्याची बाधा अन्य निरोगी जनावरांना होऊ शकते. त्यामुळे आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठिकाणी बांधणे गरजेचे आहे. गोठ्यातील जनावरांचा मलमूत्र व स्त्राव याची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
प्रत्येक शेतकºयाने आपल्या जनावरांच्या खाद्यपदार्थामध्ये सोड्याचा वापर करावा, असे सांगण्यात येते. सोडा हा साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शेतकºयांने कळपात किव्ाां नवीन जनावर आणताना १० ते १५ दिवस स्वतंत्र्य ठेवून त्या जनावरांना कळपात आणण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात.
माणमध्ये अधिकाºयांचा तीन दिवस मुक्काम
गेल्या दीड महिन्यात माण तालुक्यात ६० हून अधिक जनावरे दगावले आहेत. हा प्रकार घडल्याने जिल्'ातील पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे. माण तालुक्यात या विभागाचे अधिकारी तीन दिवस मुक्कामी होते. या परिसरात दगावलेल्या प्रत्येक जनावरांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
माण तालुक्यातील दगावलेल्या जनावरांची संपूर्ण माहिती घेत आहे. त्या जनावरांचे रक्त तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहे. जनावरे कशाने दगावली, याची माहिती लवकरच मिळेल. अन्य तालुक्यांतील शेतकºयांनी आपल्या जनावरांची देखभाल घेणे गरजेचे आहे. ज्या शेतकºयांनी जनावरांना लसीकरण केलेले नाही त्यांनी जनावरांना लसीकरणासाठी संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे. - विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सातारा