‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!

By नितीन काळेल | Published: October 19, 2024 09:38 PM2024-10-19T21:38:58+5:302024-10-19T21:41:10+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत तिघांना उमेदवारी : चंद्रकांत कांबळे, संजय गाडे रिंगणात.

Announcement of 16 more Assembly candidates from 'Vanchit'; Including 2 seats in Satara! | ‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!

‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क 
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी ‘वंचित’ उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असून शनिवारी आणखी १६ नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड दक्षिणमधून संजय गाडे आणि कोरेगाव मतदारसंघात चंद्रकांत कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. हे दोघेही ‘रिपाइं’ गवई गटाचे पदाधिकारी आहे. तर आतापर्यंत ‘वंचित’चे जिल्ह्यात तीन उमेदवार जाहीर झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठीही तयारी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील अनेक मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले आहेत. शनिवारी ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील १६ मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. संजय गाडे यांना कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे. याठिकाणी काॅंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण हे रिंगणात उतरणार आहेत. तर भाजपकडून अतुल भोसले मैदानात असतील. कोरेगाव मतदारसंघातही ‘वंचित’ने चंद्रकांत कांबळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे.

‘रिपाइं’ गवई गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे आहेत. तर याच पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे आहेत. या दोघांनीही ‘वंचित’कडे उमेदवारीची मागणी केली होती.

माणमधून इम्तियाज नदाफ उमेदवार...
वंचित बहुजन आघाडीच्या ९ आॅक्टोबरच्या दुसऱ्या यादीत माण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली. इम्तियाज नदाफ यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यातच ‘वंचित’ जिल्ह्यातील सर्वच आठ मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची नावेही लवकरच जाहीर होतील, असेही ‘वंचित’कडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

Web Title: Announcement of 16 more Assembly candidates from 'Vanchit'; Including 2 seats in Satara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.