शेतकऱ्यांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:44 AM2021-09-15T04:44:38+5:302021-09-15T04:44:38+5:30
रुग्णांचे हेलपाटे सातारा : जिल्हा रुग्णालयातील आयुष्य विभागाचा पोस्ट कोविड उपचारात रुग्णांना उपयोग होत आहे. मात्र या विभागातील वैद्यकीय ...
रुग्णांचे हेलपाटे
सातारा : जिल्हा रुग्णालयातील आयुष्य विभागाचा पोस्ट कोविड उपचारात रुग्णांना उपयोग होत आहे. मात्र या विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोना ओपीडीतील नेमणुकीमध्ये अधिक काळ काढावा लागत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत. येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहावा, अशी रुग्णांची मागणी आहे.
ॲपचे प्रात्यक्षिक
सातारा : ई-पीक पाहणी शेतकरी ॲपद्वारे करू शकणार आहे. ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी लुमणेखोल, दहिवड, सायळी येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना दिले. प्रांताधिकाऱ्यांनी मोबाईलवर ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे ई-पीक पाहणी कशी करावी, याचे प्रशिक्षण दिले. मंडलाधिकारी युवराज गायकवाड यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
दुर्वांसाठी होतेय भटकंती
सातारा : शेत शिवाराच्या बांधावर ताणनाशकाचा वापर होत असल्याने ग्रामीण भागात गणेशोत्सवात दुर्वांसाठी भटकंती करावी लागत आहे. शेताच्या बांधावर, पाण्याच्या पाटाकडेला, मोकळ्या जागेत अगदी परड्यामागेही हराळी अर्थात दुर्वा उगवतात. वर्षभर या हराळीची किंमत नसली, तरी गणेशोत्सवात या दुर्वांना विशेष महत्त्व आहे. बाप्पांची पूजा दूर्वांशिवाय पूर्णच होत नाही.
उद्या राहुटी आंदोलन
सातारा : पारधी समाजासह गोपाळ, कातकरी, वडार या भटक्या समाजासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी नसल्याने अनेकजण लाभापासून वंचित आहेत. याचा निषेध म्हणून १५ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुटी आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णा भाऊ साठे कृती समितीचे संस्थापक-अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.