सहकारभूषण धन्वंतरी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:45+5:302021-03-13T05:10:45+5:30
सातारा : येथील धन्वंतरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक-चेअरमन डॉ. रवींद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...
सातारा : येथील धन्वंतरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक-चेअरमन डॉ. रवींद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली. मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने सभा झाली.
यावेळी ज्येष्ठ संचालक डॉ. आनंद साहीगुडे, जयवंत गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक-प्रवर्तक गुरुवर्य डॉ. कन्हैय्यालाल श्रीवल्लभ लाहोटी तसेच कोरोना व इतर कारणांनी निधन झालेले संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
डॉ. रवींद्र भोसले म्हणाले, ‘लाॅकडाऊनमुळे कर्जदारांच्या आर्थिकतेचे गणित विस्कटलेले असतानाही त्यांचा कर्जवसुलीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा अनुभव आला. यावर्षी गतवर्षीपेक्षा संस्थेस चांगला नफा होईल.’
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी व्हाईस चेअरमन डॉ. कांत फडतरे, संचालक डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. शकिल आत्तार, डॉ. सुनील कोडगुले, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. राजेंद्र सलगर, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. कैलास फडतरे, डॉ. सारिका मस्कर, सूर्यकामत देशमुख, डॉ. अभिजित भोसले उपस्थित होते. (वा.प्र.)
फोटो
११सहकार भूषण
साताऱ्यातील सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेची वार्षिक सभा डॉ. रवींद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संजय पवार उपस्थित होते.