उत्कर्ष पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:29+5:302021-04-03T04:35:29+5:30
वाई : उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेची ऑनलाईन आयोजित केलेली २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अनुराधा कोल्हापुरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ...
वाई : उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेची ऑनलाईन आयोजित केलेली २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अनुराधा कोल्हापुरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशनानुसार यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन मिटिंगचे आयोजन केले होते. संस्थेच्या अधिकाधिक सभासदांनी ऑनलाईन मिटिंगला हजेरी लावली व सभेतील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी मिळाली.
सभेच्या सुरुवातीला संस्थेचे माजी उपाध्यक्ष आनंदराव लोळे व संस्थेचे ज्ञात-अज्ञात सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची सुरुवात करण्यात आली. अनुराधा कोल्हापुरे यांनी संस्थेच्या ३१ मार्च २०२० अखेर असलेल्या आर्थिक स्थितीची माहिती सभासदांना दिली. लवकरच १५० कोटींचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. संस्थेने नुकताच पुणे, ठाणे व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र वाढीसाठी प्रस्ताव पाठविला असून, लवकरच त्याला मान्यता मिळेल व त्यामुळे व्यवसाय वाढीला नक्कीच चालना मिळणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केली. संस्थेने कोरोना कालावधितही सभासदांना १० टक्के लाभांश दिला.
सुनील शिंदे, शिवाजीराव निंबाळकर, बाळकृष्ण वाघ, रामचंद्र कानडे, संतोष सणस, दत्तात्रय काळे, श्रीधर शिंदे, संदीप पावशे, राजू पवार, सुजित पावशे, जितेंद्र गांधी, गणेश कोंढाळकर, जितेंद्र शिर्के, सचिन सुळके, सचिन जंगम, शरद भोसले, राहुल तांबोळी, संतोष इथापे आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी सर्व सहभागी सभासद, सर्व ठेवीदार, कर्जदार व सभा उत्तमरितीने होण्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे देखील आभार व्यक्त केले.
रंगता बडेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संचालक ॲड. रमेश यादव, जमीरभाई शेख, मदनकुमार साळवेकर, डॉ. मंगला अहिवळे, अमर कोल्हापुरे, अशोक शिंदे, आनंदराव कांबळे, श्रीकांत शिंदे, डॉ. सुनील कारळे, मुख्य व्यवस्थापक प्रकाश पवार, उपमुख्य व्यवस्थापक बाबूराव देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वा.प्र.)