दहिवडीत आणखी २७ जण कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:47 AM2021-03-01T04:47:10+5:302021-03-01T04:47:10+5:30
दहिवडी : दहिवडीतील कोरोनाची साखळी तुटण्याचे नावच घेत नाही. रविवारी आणखी २७ रुग्ण बाधित निघाले आहेत. त्यामुळे दहिवडीतील बाधितांची ...
दहिवडी : दहिवडीतील कोरोनाची साखळी तुटण्याचे नावच घेत नाही. रविवारी आणखी २७ रुग्ण बाधित निघाले आहेत. त्यामुळे दहिवडीतील बाधितांची संख्या ५५१ झाली असून, एका फेब्रुवारी महिन्यात २१८ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे धाकधूक वाढतच आहे.
दहिवडीत कोरोनावर मात करण्यासाठी तेरा दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात आला आहे. लाॅकडाऊनच्या नवव्या दिवशी रविवारी पुन्हा २७ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात कोरोना नियंत्रणासाठी सर्व्हे सुरू आहे. त्यामुळे टेस्टचे प्रमाण वाढविले आहे. एका दिवसात १२६ तपासणी केल्या आहेत. त्यामध्ये २७ जण कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता स्वत:सोबत कुटुंबीयांची काळजी घ्यावी लागणार आहे.
दहिवडी शहरातील चावडी चौक परिसरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलीस अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण शहर कटेंन्मेन झोन आहे. मात्र, कोरोनाची साखळी तुटता तुटत नाही. चार ठिकाणी आरटीपीसी तपासण्याची सोय केली आहे. सर्व्हेसाठी २५ पथके व ८ सुपरवायझर कार्रत आहते. मोबाईल व्हॅन फिरतेपथक सज्ज आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर स्वतः दहिवडी शहराची पाहणी करीत आहेत. ही परस्थिती लवकरच नियंत्रणात येईल; मात्र लोकांचे सहकार्य आपेक्षित आहे.
चौकट
इतर गावांनाही धोका
शहरात कोरोनाची साखळी अद्याप तुटत नसताना तालुक्यात इतर ठिकाणीही कोरोनाने शिरकाव करण्यासाठी सुरुवात केली आहे. विशेषतः गोंदवले, वरकुटे-मलवडी, नरवणे या गावालाही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील सर्वच आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहेत. या शिवाय पोलिसांची गाडी अनेक गावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करीत आहे.
चौकट
काळजी घेऊ, पण लॉकडाऊन नको
दहिवडी शहरात सलग तेरा दिवस लाॅकडाऊन झाला असून, आणखी लाॅकडाऊन वाढू नये यासाठी कितीही काळजी घेऊ, पण लाॅकडाऊन वाढवू नका अशीही अनेक छोट्या व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
फोटो २८दहिवडी
दहिवडी येथे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. कोणालाही बाहेर फिरकू दिले जात नाही. (छाया : नवनाथ जगदाळे)