दहिवडीत आणखी दहा दिवसांचा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:25+5:302021-02-23T04:59:25+5:30

दहिवडी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहिवडी शहरामध्ये सलग तीन दिवसांचा लाॅकडाऊन पाळण्यात आला. आणखी नऊ रुग्ण वाढल्याने ...

Another ten days lockdown in Dahiwadi | दहिवडीत आणखी दहा दिवसांचा लॉकडाऊन

दहिवडीत आणखी दहा दिवसांचा लॉकडाऊन

googlenewsNext

दहिवडी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहिवडी शहरामध्ये सलग तीन दिवसांचा लाॅकडाऊन पाळण्यात आला. आणखी नऊ रुग्ण वाढल्याने पुन्हा दहा दिवसांचा लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

दहिवडी शहरामध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडदच होत आहे. तीन दिवसांत २३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ही साखळी तोडणे खूप जिकिरीचे झाले आहे. दहिवडी येथील बचत भवनमध्ये आज पुन्हा आढावा घेण्यात आला. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख, दहिवडीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार, नगराध्यक्ष धनाजी जाधव, उपनगराध्यक्ष नीलम शिंदे, दहिवडीचे डाॅ हेमंत जगदाळे उपस्थित होते.

यावेळी दहिवडी शहराकडे गांभीर्याने घ्यावे, जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पेशंट दहिवडी शहरात सापडत आहेत. जानेवारीपासून १०५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. ७१ जण उपचार घेत आहेत. हा आकडा रोज वाढतच आहे. त्यामुळे आणखी लाॅकडाऊन वाढवावा अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन लाॅकडाऊन आणखी दहा दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता आठवडा बाजारासह सर्व व्यवहार बंदच राहणार आहेत. तसेच विनामास्क फिरणारे लोक असतील त्यांच्याकडून दंड वसूल करून कडक कारवाई केली जाणार आहे. दहिवडीतील जे हॉटस्पॉट असतील ते सील करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

चौकट

किराणा माल घरपोच

या काळात किराणा दुकानदारांनी गरजेनुसार घरपोच सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नगरपालिकेच्या परवानगीने भाजीपाला विक्रेत्यांना मागणीनुसार घरोघरी भाजीपाला पोहोचवावा लागणार आहे.

चौकट

दहिवडीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोमवारी झालेल्या बैठकीत सर्वांच्या एकत्रित निर्णयानुसार स्थानिक प्रशासनाच्या संमतीने पुन्हा दहा दिवस लाॅकडाऊन झाला आहे. या काळात लोकांची गैरसोय न होता कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त टेस्ट केल्या जाणार आहेत. या काळात सर्व व्यापाऱ्यांनाही आरटीपीसीआर चाचण्या करुन घ्याव्यात असे आवाहन नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी केले.

२२दहिवडी-कोरोना

दहिवडीत सोमवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचत भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख, नगराध्यक्ष धनाजी जाधव उपस्थित होते. (छाया: नवनाथ जगदाळे)

Web Title: Another ten days lockdown in Dahiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.