Satara: ‘सेक्स रॅकेट’मध्ये आणखी एका महिलेस अटक, आरोपींची संख्या पाचवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:50 PM2024-08-28T12:50:31+5:302024-08-28T12:52:08+5:30
कऱ्हाड : आश्रमाच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या ‘सेक्स रॅकेट’ प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तयार केलेल्या तीन वरिष्ठ ...
कऱ्हाड : आश्रमाच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या ‘सेक्स रॅकेट’ प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तयार केलेल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने तपासाला गती दिली असून या प्रकरणात मंगळवारी आणखी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात पाच जणांना अटक झाली आहे. तर अन्य काहीजणांकडे कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.
काजल आलोरहिम शेख (वय ३०, रा. भिगवण, ता. इंदापूर, सध्या रा. गजानन हौसिंग सोसायटी, सैदापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभू येथील सेक्स रॅकेट प्रकरणात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आश्रमचालक महिलेसह वाल्मीक महादेव माने या संशयिताला अटक केली होती. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी याप्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलिसांना सखोल तपास करून कारवाईचे आदेश दिले होते.
पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ तीन अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक तयार करून या प्रकरणाच्या तपासाला गती दिली.
या तपास पथकाने रविवारी ऋतुराज शहा व सचिन माने या दोघांना अटक केली होती. त्यानंतर अटकेत असणाऱ्या चौघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता काजल शेख या महिलेचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तिलाही अटक केली आहे.