जिल्हा परिषदेच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:37 AM2021-05-01T04:37:01+5:302021-05-01T04:37:01+5:30
सातारा : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण वाढत चालले असून आतापर्यंत ९१९ जणांना संसर्ग झाला आहे, तर ...
सातारा : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण वाढत चालले असून आतापर्यंत ९१९ जणांना संसर्ग झाला आहे, तर कोरोनाने आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा १८ झाला आहे.
जिल्ह्यात एक वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू आहे, तर जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात कोरोना पोहोचला होता. जिल्हा परिषदेच्या अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, कृषी आदी विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांत तर बाधितांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे कर्मचारी बाधितांचा आकडा ९१९ झाला आहे, तर आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. संबंधित कर्मचारी कऱ्हाड तालुक्यात कार्यरत होता.
कोरोना विषाणूमुळे खटाव तालुक्यात कार्यरत सर्वाधिक ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पाटण तालुक्यातील तिघांचा, तर कोरेगाव, जावळी, फलटण आणि सातारा तालुक्यातील प्रत्येकी २ व माण आणि कऱ्हाड तालुक्यात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी गेला आहे.
....................................................