माणमधील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:03 AM2021-01-08T06:03:07+5:302021-01-08T06:03:07+5:30
सातारा : मागील काही दिवसांपासून माण तालुक्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यातच अवकाळी पाऊसही झाला. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे ...
सातारा : मागील काही दिवसांपासून माण तालुक्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यातच अवकाळी पाऊसही झाला. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माण तालुक्यातील शेतकरी सतत निसर्गाशी सामना करीत आला आहे. चार महिन्यांपूर्वी तर अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी कसाबसा सावरत होता. असे असतानाच आता अवकाळी पावसामुळे चिंता निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण कायम आहे. त्यातच अवकाळी पाऊसही काही ठिकाणी झाला. यामुळे डाळिंब, द्राक्षबागांना धोका निर्माण झाला आहे. तसेच ज्वारी, हरभरा, गहू पिके चांगल्या स्थितीत आहेत. या पिकांवर रोग पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांचीही फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
.................................................