अप्पासाहेब सार्वजनिक जीवनाचे भूषण : राम नाईक: जयवंतराव भोसलेंना जयंतीदिनी अभिवादन; म्युझियमचे लोकार्पण, पुतळ्याचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:35 PM2017-12-22T23:35:40+5:302017-12-22T23:36:14+5:30
कºहाड : ‘जयवंतराव भोसले हे जबरदस्त इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्त्व होते. म्हणून तर त्यांच्या हातून एवढे मोठे कार्य उभे राहिले. त्यांच्या कार्याविषयी ऐकून होतो;
कºहाड : ‘जयवंतराव भोसले हे जबरदस्त इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्त्व होते. म्हणून तर त्यांच्या हातून एवढे मोठे कार्य उभे राहिले. त्यांच्या कार्याविषयी ऐकून होतो; पण ते प्रत्यक्ष पाहता यावे, त्यातून मला काही प्रेरणा घेता यावी म्हणून आजच्या जयंती कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो. अप्पासाहेब महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनाचे भूषण आहेत,’ असे मत उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले.
कºहाड येथे जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते जयवंतराव भोसले म्युझियमचे लोकार्पण, जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि ‘भगीरथ’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार पतंगराव कदम, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार दिलीप देशमुख, चिमणराव डांगे, मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. सुरेश भोसले, रघुनाथराजे निंबाळकर, मधुकर भावे, डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राम नाईक म्हणाले, ‘मी आमदार असताना १९८० मध्ये जयवंतराव भोसले हेही काहीकाळ विधान परिषदेवर आमदार होते. त्यावेळी त्यांच्याशी माझा परिचय झाला. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची त्यावेळी ख्याती निर्माण झाली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मनात कुतूहल होते. येथे आल्यानंतर त्यांच कर्तृत्व पाहायला आणि ऐकायला मिळालं. अन् अप्पासाहेब महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनाचे भूषण आहेत, याची मनोमन खात्री पटली. माणसं अलहाबादला त्रिवेणी संगम पाहायला येतात; पण याठिकाणी जयवंतराव भोसले यांच्या म्युझियमचे लोकार्पण, पुतळ्याचे अनावरण आणि त्यांच्यावरील ‘भगीरथ’ या ग्रंथाचे प्रकाशन करून त्रिवेणी संगम साधला.’
डॉ. पतंगराव कदम म्हणाले, ‘यशवंत हो, जयवंत हो या दोन भावांचं कर्तृत्व साºया महाराष्ट्रानं पाहिलं आहे. यशवंतराव चव्हाण यांनीही या दोघांना खिलार बैलांची जोड म्हणून गौरविले होते. त्यांचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे.’
शिवाजीराव नाईक म्हणाले, ‘कृष्णा काठावर परिवर्तन घडविणारे नेतृत्व म्हणून जयवंतराव भोसले यांच्याकडे पाहावे लागेल. राज्याला प्रेरणा देतील, अशा प्रकारे त्यांनी संस्थांचा कारभार करून दाखविला.’
माजी मंत्री दिलीप देशमुख म्हणाले, ‘सहकार क्षेत्र हे लोकशाहीच्या बळकटीचे क्षेत्र आहे, हे जयवंतराव भोसले यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.’
मदनराव मोहिते म्हणाले, ‘जयवंतराव भोसले यांनी ‘आधी केले आणि मग सांगितले’ या उक्तीचा वापर केला. त्यामुळेच ही विकासगंगा पाहायला मिळते.’
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘अप्पांची जयंती आम्ही संकल्प दिन म्हणून साजरी करतो. त्यांनी केलेल्या कामाला यादिवशी उजाळा देतो. आणि जे अपूर्ण आहे, ते पूर्ण करण्याचा संकल्प करीत असतो.’
डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण आज तितक्याच तोलामोलाचे असणाºया व्यक्तीच्या हस्ते होत आहे. उत्तरप्रदेशला उत्तम प्रदेश बनविण्याचा प्रयत्न राम नाईक करीत आहेत.’
... अन् साºयांचे डोळे पाणावले
जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती होती. तर समोर हजारो कार्यकर्तेही होते. व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला जयवंतराव भोसले यांच्या अर्धांगिनी जयमाला भोसले स्थानापन्न झाल्या होत्या. आणि कार्यक्रमाच्या मध्येच अप्पांना सुख-दु:खात साथ देणाºया जयमाला भोसले यांना सत्कारासाठी व्यासपीठावर बोलविण्यात आले. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले. तर सहृदयी सत्कार पाहून उपस्थितांच्या पापण्याही ओलावल्या.
कºहाड येथे शुक्रवारी जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी मंत्री पतंगराव कदम, डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.