लाचेची मागणी करणारा लिपिक अधिकाऱ्यांसमोर हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:46 PM2019-09-04T13:46:48+5:302019-09-04T13:47:58+5:30
लाचेची मागणी करून पसार झालेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अमित सुनील राजे (वय ३५) हा बुधवारी सकाळी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. शहर पोलीस ठाण्यात लिपिक राजेवर चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
सातारा : लाचेची मागणी करून पसार झालेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अमित सुनील राजे (वय ३५) हा बुधवारी सकाळी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. शहर पोलीस ठाण्यात लिपिक राजेवर चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
सीटी स्कॅन, सोनोग्राफी मशीनचे रजिस्ट्रेशन तसेच हॉस्पीटल परवाना नुतनीकरणासाठी लिपिक अमित राजे याने तक्रारदाराकडे ४० हजारांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे रितसर लेखी तक्रार केली होती.
नुसार लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी अमित राजेला पकडण्यासाठी सापळा लावला होता. मात्र, त्याला संशय आल्याने तो लाच न स्वीकारताच पसार झाला होता. राजे हा पुणे येथे वास्तव्य करतो. त्याच्या घरात जाऊन अधिकाऱ्यांनी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी तो अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याला दुपारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.