ऑक्सिजनच्या ऑडिटसाठी तपासणी पथकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:37 AM2021-05-15T04:37:44+5:302021-05-15T04:37:44+5:30

सातारा : रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे ...

Appointment of inspection teams for oxygen audit | ऑक्सिजनच्या ऑडिटसाठी तपासणी पथकांची नियुक्ती

ऑक्सिजनच्या ऑडिटसाठी तपासणी पथकांची नियुक्ती

Next

सातारा : रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे प्राचार्य व प्राध्यापक यांची सेवा २८ एप्रिलच्या आदेशानुसार अधिग्रहित करण्यात आलेली आहे.

सातारा जिल्ह्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीतदेखील वाढ झाली आहे. तथापि, ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. एकूण ऑक्सिजन पुरवठ्याची गंभीर स्थिती पाहता ऑक्सिजन वाया न जाऊ देता ऑक्सिजनचा कार्यक्षम वापरणे अत्यंत आवश्यक आहे.

रुग्णालयांच्या प्रमुखांनी व संस्था प्रमुखांनी तपासणी पथकास तपासणीकरिता आल्यानंतर पीपीई कीट, फेस शिल्ड, ग्लोव्हज् परिधान करणे व काढणे या बाबतची माहिती देऊन ती उपलब्ध करून द्यावी. तपासणी वेळी आढळलेल्या त्रुटींची पूर्तता निश्चिती मुदतीत करणे बंधनकारक आहे. संबंधित रुग्णालयाने रुग्णास आवश्यक तेवढाच ऑक्सिजन पुरवठा करणे अपेक्षित आहे. अति ऑक्सिजन पुरवठ्यामुळे गंभीर दुष्परिणाम दिसून आल्याने, रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा करावा. ऑक्सिजन ऑडिटबाबतचा त्रुटीपूर्तता अहवाल रुग्णालय प्रमुखांनी आक्सिजन ऑडिट पथकामार्फत सादर करावा.

म्युकर मायकोसिसचा धोका वाढतोय

म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी हुमीडीफायर बॉटलमध्ये डिस्टिल्ड वॉटर टाकण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात ते उपलब्ध नसताना युवी थ्रीटेड प्रक्रिया उकळून केलेले थंड पाणी वापरण्याबाबत सूचना द्याव्यात. कोणत्याही परिस्थितीत साध्या नळाच्या पाण्याने भरल्या जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत रुग्णालयांना सूचना द्याव्यात.

Web Title: Appointment of inspection teams for oxygen audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.