उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:39 AM2021-02-24T04:39:52+5:302021-02-24T04:39:52+5:30
वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे गरजेची गोष्ट आहे. म्हणूनच संस्थेच्या वतीने ‘शिवशाही रत्न’ या पुरस्काराचे ...
वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे गरजेची गोष्ट आहे. म्हणूनच संस्थेच्या वतीने ‘शिवशाही रत्न’ या पुरस्काराचे वितरण केले जाते असे प्रतिपादन ओम शिवराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड नर्सिंग सायन्सचे संस्थापक अध्यक्ष संजय भावके यांनी केले.
घोगाव ता.कराड येथे ओम शिवराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड नर्सिंग सायन्समध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भावके बोलत होते.
भावके म्हणाले, समाजात आज चांगले काम करणारे कमी दिसतात. अशावेळी चांगले काम करणारांची दखल घेतल्यावर त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळू शकते.
यावेळी कराडचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, धनाजी काटकर, भिमराव धुळप ,अमित चव्हाण, शरद गाडे, संभाजीराव थोरात, सलिमा इनामदार, संजय पाटील या मान्यवरांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘शिवशाही रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास नर्सिंग काॅलेजच्या प्राचार्या आशा जकनूर, इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या प्राजक्ता सोळंकुरे ,अश्विनी भोपते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
फोटो ओळ :घोगाव ता.कराड येथे शिवशाही रत्न पुरस्काराचे वितरण करताना संजय भावके.
फोटो :23 pramod 01