लायन्स क्लब एमआयडीसीचे कार्य कौतुकासपद : बोडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:48 AM2021-09-16T04:48:47+5:302021-09-16T04:48:47+5:30

सातारा : गुरुजनांचा सन्मान करण्याचे भाग्य यानिमित्ताने लाभले हे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे शिक्षकांच्या मुळेच मी घडलो त्यांच्या ...

Appreciation of the work of Lions Club MIDC: Bodke | लायन्स क्लब एमआयडीसीचे कार्य कौतुकासपद : बोडके

लायन्स क्लब एमआयडीसीचे कार्य कौतुकासपद : बोडके

Next

सातारा : गुरुजनांचा सन्मान करण्याचे भाग्य यानिमित्ताने लाभले हे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे शिक्षकांच्या मुळेच मी घडलो त्यांच्या संस्कारांमुळेच निराधार लोकांच्या सेवेसाठी काम करत राहिलो याचा मला मनापासून आनंद आहे लायन्स क्लब एमआयडीसीचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे, असे मत यशोधन निराधार संस्थेचे संस्थापक रवी बोडके यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब सातारा एमआयडीसीच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून विलासपूर मधील स्व. आ अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन या ठिकाणी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. रिजन चेअरमन शिवाजीराव फडतरे झोन चेअरमन, महेंद्र कदम, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, ज्येष्ठ नेते शशिकांत पारेख, एमजेफ राजेंद्र मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यांच्या हातून असेच सत्कार्य घडत राहो

प्रास्ताविकामध्ये क्लबचे अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी पूर्ण जगभरामध्ये लायन्स क्लबच्या वतीने समाजकार्य करण्यात येते याचंच एक भाग म्हणून आम्ही गरजूंना मदत आणि सेवा देण्याचे काम करीत आहोत ते पुढे अखंडपणे राहील, याची ग्वाही देतो. यावेळी रिजन चेअरमन शिवाजीराव फडतरे ज्येष्ठ नेते शशिकांत पारीख व शिक्षकांच्या वतीने किशोर टोणपे यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी फॉरेस्ट कॉलनीतील मैदानात मान्यवरांच्या व शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करणयात आले. क्लबचे अध्यक्ष आनंद गायकवाड यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लबचे खजिनदार कुलदीप मोहिते स्वागत क्लबचे उपाध्यक्ष बाळासाहेब महामुलकर यांनी केले व आभार सचिव प्रसाद देशमुख यांनी मानले कार्यक्रमासाठी विलासपूरमधील अंगणवाडी व परिसरातील शिक्षक गुरुजन, अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ मोटे, काका बिचकर, डी. वाय. पाटील, श्रीकांत तोडकर, कीर्ती तोडकर, सचिन साळुंखे, चेतन खराडे, युवराज जाधव, युवराज काळे, काका बागल, मयूर महामुलकर, विनोद मोरे क्लबचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

फोटो : ११लायन्स

Web Title: Appreciation of the work of Lions Club MIDC: Bodke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.