हेळगाव येथे प्रेक्षागृहास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:51+5:302021-06-03T04:27:51+5:30

मसूर : कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील हेळगांव ता.कराड येथे महाराष्ट्र राज्याचे सरकार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील ...

Approval of auditorium at Helgaon | हेळगाव येथे प्रेक्षागृहास मंजुरी

हेळगाव येथे प्रेक्षागृहास मंजुरी

Next

मसूर : कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील हेळगांव ता.कराड येथे महाराष्ट्र राज्याचे सरकार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विशेष प्रयत्नाने बंदिस्त प्रेक्षागृह बांधकामासाठी कोटी ५५ लाख रुपये मंजूर जाले आहेत. या निधीतून ४० मीटर बाय २६ मीटरची इमारत बांधण्यात येणार असून, त्यामध्ये ४ बॅडमिंटन कोर्ट व ४ टेबल टेनिस कोर्टची सुविधा करण्यात येणार आहे. या प्रेक्षागृहामध्ये सुमारे ५०० प्रेक्षक बसण्याची सोय होणार आहे.

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य या योजनेंतर्गत मंजूर झाले असून, राज्यातील शैक्षणिक संस्था, क्रीडामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यामधून दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करून, त्याद्वारे खेळाडूंच्या कामगिरीत वाढ करून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करणे इत्यादीस चालना मिळवून देण्यास उपयुक्त होणार आहे. या प्रेक्षागृहामुळे हेळगाव विभागातील अनेक गावांमधील खेळाडूंची व्यायामाची सोय होणार आहे, तसेच अनेक क्रीडा स्पर्धा भरवण्यास हे प्रेक्षागृह उपयोगात येणार आहे. त्यामुळे हेळगांव या गावाच्या व परिसराच्या वैभवात भर पडणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, लोक मंत्री बाळासाहेब पाटील यांना धन्यवाद देत आहेत, हा निधी उपलब्ध करणेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांचे सहकार्य लाभल्याचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

फोटो - बाळासाहेब पाटील

Web Title: Approval of auditorium at Helgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.