वाईमध्ये गॅस शवदाहिनी उभारणीस मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:22+5:302021-05-29T04:28:22+5:30

वाई : शहराच्या रविवार पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत द्रवरूप (एलपीजी) गॅस शवदाहिनी उभारण्यासाठी ८२ लाख ५८ हजार रुपये निधी मंजूर ...

Approval for erection of gas crematorium in Y. | वाईमध्ये गॅस शवदाहिनी उभारणीस मान्यता

वाईमध्ये गॅस शवदाहिनी उभारणीस मान्यता

Next

वाई : शहराच्या रविवार पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत द्रवरूप (एलपीजी) गॅस शवदाहिनी उभारण्यासाठी ८२ लाख ५८ हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

मकरंद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, इंधन खर्चात बचत करणाऱ्या आणि वृक्ष व पर्यावरण यांचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या कामासाठी आमदार आमदार पाटील यांनी दीर्घकाळ पाठपुरावा केला होता. वाई रोटरी क्लब व पर्यावरणप्रेमी व्यक्ती, संस्थांनी या प्रकल्पासाठी सातत्याने आग्रह धरला होता. त्यानुसार नगरोत्थान योजनेतून शवदाहिनी उभारणीसाठी ६३ लाख ८७ हजार रुपये तर शवदाहिनीकरिता निवाराशेड बांधकामासाठी १९ लाख ११ हजार रुपयांच्या खर्चाला जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वार्षिक योजनेतून करायच्या या कामाला नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार वाई शहरातील मुख्य स्मशानभूमीत एलपीजी गॅस शवदाहिनी उभारण्यात येणार आहे. या शवदाहिनीच्या उभारणीनंतर वाई नगर परिषदेने तिची देखभाल करावयाची आहे, असेही मान्यता आदेशात नमूद आहे. दरम्यान, पालिकेने त्यासाठी निविदा मागवल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

चौकटी :

रोटरी क्लबने शहरातील मुख्य स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याची संकल्पना पाच वर्षांपूर्वी मांडली होती. पालिकेच्या सहकार्याने व लोकसहभागातून हा प्रकल्प हाती घेण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यासाठी निधी जमा करण्यास सुरुवात केली होती तसेच आमदार मकरंद पाटील याच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. दरम्यान, खर्च वाढल्याने या प्रकल्पाचा नाद सोडला होता. परंतु, दोन वर्षांपूर्वी आमदार पाटील यांनी स्वतः भेटून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून यासाठी निधी मंजूर करून घेतला. पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हा प्रकल्प उभा करावा, अशी मागणी वाई रोटरी क्लबचे डॉ. शरद अभ्यंकर यांनी केली आहे.

Web Title: Approval for erection of gas crematorium in Y.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.