येळगाव, म्हासोली केंद्रातील पदे भरण्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:11+5:302021-06-10T04:26:11+5:30

उंडाळे : कऱ्हाड दक्षिण डोंगरी विभागातील येळगाव व म्हासोली या दोन्ही आरोग्य केंद्रांच्या आकृत्तिबंधानुसार पदनिर्मितीस शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ...

Approval to fill the posts in Yelgaon, Mhasoli Center | येळगाव, म्हासोली केंद्रातील पदे भरण्यास मंजुरी

येळगाव, म्हासोली केंद्रातील पदे भरण्यास मंजुरी

Next

उंडाळे : कऱ्हाड दक्षिण डोंगरी विभागातील येळगाव व म्हासोली या दोन्ही आरोग्य केंद्रांच्या आकृत्तिबंधानुसार पदनिर्मितीस शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांनी दिली.

ॲड. पाटील म्हणाले, दक्षिण डोंगरी विभागातील जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात, या हेतूने माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील यांनी येळगाव व म्हासोली आरोग्य केंद्रांना मंजुरी घेतली होती. दोन्ही आरोग्य केंद्रांची बांधकामे पूर्ण आली असून, ही आरोग्य केंद्रे पदनिर्मितीच्या प्रतीक्षेत होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून अखेर आरोग्य केंद्रातील पदे भरण्यास मंजुरी मिळाल्याने लवकरच आरोग्य केंद्रे रुग्णसेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन पदासह १५ पदे भरली जाणार आहेत.

येळगाव व म्हासोली प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड दक्षिण डोंगरी विभाग आरोग्य सेवेत परिपूर्ण होणार आहे. लवकरच ही दोन्ही आरोग्य केंद्र सुरू होतील. या विभागात दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या दूरदृष्टीमुळे एक ग्रामीण रुग्णालय, तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, सहा आरोग्य उपकेंद्र असून, लवकरच जिंती-अकाईची वाडी, मनव, तुळसण, गोटेवाडी येथे उपकेंद्रे मंजूर असून, ती ही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

उंडाळे ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू केले असून, शासनाच्या निधीतून सुमारे १ कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचे काम सुरू आहे. शासन व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिका, उपकरणे, औषधे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे उदयसिंह पाटील यांनी सांगितले.

Web Title: Approval to fill the posts in Yelgaon, Mhasoli Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.