कवठे कोरोना केंद्रात आणखी ३० बेडसह व्हेंटिलेटरला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:30+5:302021-05-17T04:37:30+5:30
वेळे : कवठे, ता. वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना केअर सेंटर सुरू झाल्यापासून वाई तालुक्यातील बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांची ...
वेळे : कवठे, ता. वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना केअर सेंटर सुरू झाल्यापासून वाई तालुक्यातील बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांची या आरोग्य केंद्रात सोय होत आहे. या आरोग्य केंद्रात सद्य:स्थितीत तीस ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. मात्र, दिवसेंदिवस तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत असलेल्या संख्येमुळे हे तीस बेडसुद्धा अपुरे पडत आहेत. त्यामुळे आणखी तीस बेड व व्हेंटिलेटरला तत्त्वत: मंजुरी दिली असून, कार्यवाही करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत, अशी माहिती किसन वीर कारखान्याचे माजी संचालक संदीप पोळ यांनी दिली.
किसन वीर कारखान्याचे माजी संचालक संदीप पोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे परिस्थिती सांगितली. सद्य:स्थितीत वाई तालुक्यामध्ये व्हेंटिलेटर बेडची संख्या ही अत्यल्प असून, व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, कवठे परिसरातील व तालुक्यातील कित्येक रुग्ण हे योग्य वेळी व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने दगावल्याच्या घटना घडत आहेत. वाई तालुक्यातील खासगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर बेडची संख्यासुद्धा नगण्य आहे. त्यांचा उपचाराचा दर हा सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याने शासकीय पातळीवर कवठे येथील कोविड सेंटरमध्ये ही सोय उपलब्ध झाल्यास व आणखी तीस बेड येथे मिळाल्यास नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबेल. ही बाब निदर्शनास आणून दिल्याने आरोग्यमंत्री टोपे यांनी तातडीने तत्त्वत: मंजुरी देत जिल्हा प्रशासनास आदेश दिल्याने कवठे परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.
===Photopath===
160521\img-20210516-wa0009.jpg
===Caption===
कवठे कोविड सेंटरमध्ये आणखी ३० बेड व व्हेंटीलेटर बेडच्या सोयीची मागणी : संदीप पोळ